Cricket World Cup 2023 : पुढचे तीन दिवस, तीन सामने; कोण ठरणार भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी?

मात्र भारताचे प्रतिस्पर्धी न्यूझीलंड, पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातून निश्चित होणार आहे.
world cup
world cupsakal
Updated on

कोलकाता - मॅक्सवेलच्या धडाक्यामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर शानदार विजय मिळवला आणि एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील चौथ्या स्थानासाठी तीन दिवसांत तीन संघ शर्यतीत असणार आहेत आणि हा संघ भारताचा प्रतिस्पर्धी असणार आहे.

आतापर्यंतच्या गुणांनुसार भारत (१), दक्षिण आफ्रिका (२) आणि ऑस्ट्रेलिया (३) अशी क्रमवारी आहे. उपांत्य फेरीचा एक सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघात होणार त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात असणार, हे निश्चित आहे. मात्र भारताचे प्रतिस्पर्धी न्यूझीलंड, पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातून निश्चित होणार आहे. या तीन संघांचे पुढील तीन दिवसांत सामने होणार आहेत.

न्यूझीलंड - श्रीलंका (गुरुवार), दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान (शुक्रवार) आणि इंग्लंड - पाक (शनिवार) असे तीन सामने आहेत. न्यूझीलंड, पाक आणि अफगाणिस्तान या तिघांचे प्रत्येकी आठ गुण झाले आहेत. केवळ निव्वळ सरासरीमुळे तिघांच्या क्रमवारीत बदल आहे.

world cup
Cricket World Cup 2023 : अव्वल नंबरी भारत आणि भारतीय खेळाडू; एकदिवसीय क्रमवारीत गिल, सिराज पहिल्या स्थानावर

.अशी आहे सध्याची स्थिती

न्यूझीलंड ः

८ सामन्यातून ८ गुण (०.३९८)

पाकिस्तान ः

८ सामन्यातून ८ गुण (०.०३६)

अफगाणिस्तान ः

८ सामन्यातून ८ गुण (-०.३३८)

काय आहेत समीकरणे

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाल्यास त्यांना अधिक संधी; पण पावसामुळे सामना झाला नाही, तर त्यांचे नऊ गुण होतील आणि त्यांच्या आशा अंधुक होऊ शकतील (हा सामना बंगळूरला आहे).

world cup
World Cup 2023 : भारत, आफ्रिकेला हरवणे आव्हानात्मक! ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे मत

अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना आहे. हा सामना जिंकणे त्यांना सोपे नाही आणि जिंकलाच तर तो फार मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. कारण आत्ता त्यांची निव्वळ सरासरी उणे (-) आहे.

पाकला अधिक संधी आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्धची लढत जिंकली, तर त्यांच्या आशा कायम राहतील. शर्यतीत असलेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्ताननंतर त्यांचा सामना असल्यामुळे पाकला नेमकी स्थिती समजणार आहे; पण इंग्लंडने विजय मिळवला, तर पाकचे आव्हान संपुष्टात येईल.

world cup
Cricket World Cup 2023 : विजयामुळे अफगाणिस्तानही; उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम

...तर भारताचा सामना ईडनवर

बंगळूरचे हवामान आणि सध्याचा फॉर्म पाहता पाकला अधिक संधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारत-पाक उपांत्य सामना झाला, तर तो ईडन गार्डनला होईल आणि आफ्रिका- ऑस्ट्रेलिया सामना वानखेडेवर असेल. पाकव्यतिरिक्त भारताचे दुसरे कोण प्रतिस्पर्धी असतील, तर तो सामना वानखेडेवर होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.