भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याला 2007 च्या वनडे वर्ल्ड कपची आठवण झालीये. दुबईच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाने कोणती मोठी चूक केली, यावर भाष्य करताना सेहवागने 2007 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे उदाहरण दिले आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून मोठी चूक केली. अशीच चूक 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्याबाबतीत घडली होती. बॅटिंग ऑर्डरमधील या बदलामुळे त्यावेळीही टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीत संपुष्टात आला होता, असे सेहवाने म्हटले आहे.
क्रिकबझच्या खास कार्यक्रमात सेहवाग म्हणाला की, 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपण दोन चुका केल्या होत्या. सलग 17 सामने जिंकून आपण वर्ल्ड कप स्पर्धेत उतरलो होतो. वर्ल्ड कपवेळी संघाच्या प्रशिक्षकांनी बॅटिंग प्रॅक्टिसची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी पहिले दोन सामने जिंकून उर्वरित सामन्यात बॅटिंग ऑर्डरचे प्रयोग करु, असे मत व्यक्त केले होते. पण प्रशिक्षकाने याला साफ नकार दिल्याचा किस्साही त्याने शेअर केला.
सहवाग पुढे म्हणाला की, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामी जोडी चांगली कामगिरी करत होती. पण तरीही ही जोडी फोडली गेली. तेंडुलकर मध्यफळीतील उपयुक्त ठरेल, असा गेम प्लॅन होता. युवराज सिंग, राहुल द्रविड आणि महेंद्र सिंह धोनी संघात असताना या रणनितीची आवश्यकता होती का? सचिनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यावर काय झाले हे आपण अनुभवले आहे. ज्यावेळी संघ खराब कामगिरी करत असतो त्यावेळी रणनितीमध्ये बदल करायचा असतो, असे सांगत सेहवागने भारतीय संघाच्या सध्य रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.
2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा खेळ साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. ग्रेग चॅपल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नाव न घेता ग्रॅप चॅपल यांची चुकीच्या रणनितीवर भाष्य करत सेहवागने सध्याच्या टीम मॅनेजमेंटमध्येही गोंधळाचे वातावरण असल्याचा टोलाच लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.