Rohit Sharma: 'वयाच्या 17 वर्षीही रोहित करायचा पॉवर हिटिंग, 2011 वर्ल्ड कपनंतर...', माजी संघसहकाऱ्याने सांगितल्या आठवणी

Abhishek Nayar on Rohit Sharma: रोहितचा मित्र आणि माजी संघसहकाऱ्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला असून त्याचं कौतुक केलं आहे.
Rohit Sharma | T20 World Cup 2024
Rohit Sharma | T20 World Cup 2024Sakal
Updated on

Rohit Sharma News: भारताचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच वर्ल्ड कप विजयाचे त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. मात्र या विजेतेपदानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

यादरम्यान, त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच असलेल्या पॉवर हिटिंगच्या कौशल्याबद्दल त्याचा मुंबई संघातील संघसहकारी आणि मित्र अभिषेक नायरने खुलासा केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नायरने २००३ मध्ये त्याची रोहितशी मैत्री कशी झाली हे देखील सांगितले आहे. त्याने सांगिते की हैदराबादला मोईन-उद-दौलाह गोल्ड कप खेळायला गेलेले असताना नायर आजारी पडला होता.

त्यावेळी त्याचा रुममेट रोहित शर्मा होता. पण रोहितने त्यावेळी नायरला डिस्टर्ब न करण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यावेळी रोहित नुकतेच मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळून आला होता. तसेच खूप लाजाळू आणि कमी बोलणारा होता. पण हळुहळू त्याची नायरशी मैत्री झाली, जी आजही चांगली राहिली.

Rohit Sharma | T20 World Cup 2024
T20 World Cup: तेव्हा श्रीसंत, तर आता सूर्या...! भारताला दोन टी20 वर्ल्ड कप जिंकून देणारे ते विनिंग कॅच, पाहा Video

तसेच नायरने रोहितच्या फलंदाजीबद्दल सांगितले की 'आम्ही एका सामन्यात एकत्र फलंदाजी करत होतो. मी तेव्हा त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अविश्वसनीय षटकार मारताना पाहिलं होतं. त्यावेळी हे फार क्वचित दिसायचं. त्याने साधारण ३० धावांच्या आसपास खेळी केली असेल, पण त्याच्या षटकार मारण्याच्या क्षमतेने मी प्रभावित झालो होतो.'

'त्यानंतर मला हे समजले होते की रोहित स्पेशल आहे. मी नेहमीच त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला. तो मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळतानाही मोठे षटकार मारायचा, तेही सातत्याने. त्याच्या षटकारावर चेंडू ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियमच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर जाऊन पडायचे. १७ वर्षांच्या एखाद्या खेळाडूचे असे पॉवर हिटिंग तुम्ही क्वचितच पाहाता.'

त्यानंतर रोहितचा १९ व्या वर्षीच भारतीय संघात समावेश करण्यात आला. रोहितने ४ एप्रिल २००७ रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून गुजरातविरुद्ध खेळताना शतक केले होते.

त्यावेळी गुजरातने १४२ धावांचे आव्हान दिले होते. त्यावेळी मुंबईने ३२ धावात ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर रोहितने फलंदाजीला येत ४५ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात १३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. हे टी२० क्रिकेटमधील भारतीय खेळाडूने केलेले पहिले शतक होते.

Rohit Sharma | T20 World Cup 2024
T20 World Cup 2024: कॅच घेताना सूर्याचा पाय बाऊंड्रीला लागला होता? दक्षिण आफ्रिकेच्याच दिग्गजाने दिलं उत्तर

नायरने पुढे सांगितले, 'सिद्धार्थ त्रिवेदीच्या गोलंदाजीवर त्याच्या एका षटकाराने ब्रेबॉर्नच्या स्टेडियममधील एक काच फोडली होती. तो एकच सामना होता, ज्यात रोहितला मोठ्या धावा मिळाल्या होत्या. पण तरी त्याची लगेचच भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे श्रेय दिलीप वेंगसरकर सरांना जाते, ज्यांनी त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवून त्याला संधी दिली.'

रोहित त्यावर्षी म्हणजेच २००७ साली झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.

याबाबत बोलताना नायर म्हणाला, '२०११ वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळणे हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा नकार होता. भारताने तो विश्वचषकही जिंकल्याने, रोहितला वैयक्तिकरित्या त्याने खूप काही गमावल्यासारखं वाटलं होतं. पण मी त्या क्षणाला त्याच्यासाठी मोठा बदल असल्याचे म्हणेल.'

'त्यानंतर त्याने स्वत:मध्ये बदल करण्यास सुरुवात केली. त्याचा ऍटिट्युड आणि मानसिकता बदलली. त्याने फिटनेसवर लक्ष दिलं. त्याच्या पूर्ण १८० डिग्रीचा बदल झाल्याचं मी पाहिलं.'

नायरने रोहितला त्याच्या फिटनेससाठी मदतही केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.