Afg vs Aus : जोर का झटका धीरे से... टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या ठेचल्या नांग्या

Afghanistan Defeat Australia By 21 Runs T20 World Cup 2024 Super 8 : टी-20 वर्ल्ड कपच्या 48 व्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला आहे.
Afghanistan Create History As They Defeat Australia By 21 Runs T20 World Cup 2024  Super 8
Afghanistan Create History As They Defeat Australia By 21 Runs T20 World Cup 2024 Super 8

T20 World Cup 2024 AUS vs AFG : टी-20 वर्ल्ड कपच्या 48 व्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 148 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ अवघ्या 127 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 21 धावांनी गमावला. या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Afghanistan Create History As They Defeat Australia By 21 Runs T20 World Cup 2024  Super 8
T20 World Cup 2024 : अंपायरशी वाद भोवला! वर्ल्ड कपदरम्यान संघाच्या स्टार खेळाडूवर ICCने घेतली मोठी ॲक्शन

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघांनी चांगली सुरुवात केली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. गुरबाजने 60 धावांची खेळी खेळली आणि इब्राहिम झद्रानने 51 धावा केल्या. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि त्यांना 20 षटकात केवळ 148 धावा करता आल्या.

मधल्या फळीत करीम जनातने 13 आणि मोहम्मद नबीने 10 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने या स्पर्धेत सलग दुसरी हॅटट्रिक घेतली आणि एकूण 3 बळी घेतले.

Afghanistan Create History As They Defeat Australia By 21 Runs T20 World Cup 2024  Super 8
Video : 'काय करतोयस यार...' रोहित शर्माची स्टंप माइक रेकॉर्डिंग पुन्हा व्हायरल, आता कोणावर भडकला कॅप्टन?

149 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कांगारू संघाला पहिल्याच षटकातच मोठा धक्का बसला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर कर्णधार मार्शही 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नवीन उल हकने या दोन्ही विकेट घेतल्या. तर अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरही फ्लॉप ठरला आणि 3 धावा करून बाद झाला, पण मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलने 59 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. पण गुलबदिन नायबच्या उत्कृष्ट स्पेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील खेळाडूने नांग्या टाकल्या. गुलबदिन नायबने 4 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले.

यावेळी अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला आहे. या पराभवामुळे कांगारू संघ संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण त्यांचा पुढील सामना भारतीय संघाशी होणार आहे. ज्याने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com