T20 World Cup: यंदाचा टी20 वर्ल्ड कप ठरणार ऑस्ट्रेलियासाठी ऐतिहासिक? जर कांगारू चॅम्पियन झाले तर...

Australia Cricket Team: यंदाच्या टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जर जिंकले, तर आजपर्यंत कोणालाच न जमलेला ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर होईल.
Australia Cricket Team
Australia Cricket TeamSakal
Updated on

T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठीच्या सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. यंदा तब्बल 20 संघात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसेच अमेरिकेत पहिल्यांदाच इतकी मोठी क्रिकेट स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली, तर जवळपास सर्वच आयसीसी स्पर्धांवर सध्या त्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. तसेच तिन्ही क्रिकेट प्रकारातील आयसीसी स्पर्धांमधील ते सध्याचे चॅम्पियन होतील.

Australia Cricket Team
T20 World Cup 2024: फिल्डिंगसाठी उतरले कोच आणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

म्हणजेच सध्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये टेस्ट चॅम्पियनशीप आणि वनडे वर्ल्ड कप विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात गेल्यावर्षी या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले होते.

तसेच 19 वर्षांखालील पुरुष वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपदही ऑस्ट्रेलियाकडे आहे. याशिवाय महिला क्रिकेटमध्येही वनडे आणि टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळे जवळपास सर्वच महत्त्वाचा स्पर्धांचे विजेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे.

त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचेही विजेतेपदही मिळवले, तर ते एकाचवेळी पुरुषांच्या कसोटी, वनडे आणि टी20 मधील विश्वविजेते होतील आणि असा पराक्रम करणाराही पहिलाच देश ठरतील.

या स्पर्धांचे ऑस्ट्रेलियाकडे नाही विजेतेपद

सध्या ऑस्ट्रेलियाकडे 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद नाही. सध्या या स्पर्धांचे विजेतेपद भारताकडे आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पाकिस्तानकडे आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 साली झाली होती, त्यानंतर आता ही स्पर्धा 2025 मध्ये होणार आहे.

Australia Cricket Team
T20 World Cup: है तैयार हम...! रोहित अन् हार्दिक पांड्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; BCCI ने शेअर केला 'तो' 2 मिनट 12 सेंकदाचा Video

टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणार आहेत. त्यांनी पहिला सराव सामना नामेबियाविरुद्ध जिंकला आहे. तसेच त्यांचा दुसरा सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 30 मे रोजी होणार आहे.

या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा पहिल्या फेरीसाठी बी ग्रुपमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या फेरीतील पहिला सामना 6 जून रोजी ओमानविरुद्ध होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - मिशेल मार्श (कर्णधार), एश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, नॅथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, ऍडम झाम्पा.

राखीव खेळाडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, मॅट शॉर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.