Axar Patel IND vs ENG : टीम इंडियाच्या 'बापू'नं पहिल्याच चेंडूवर केली कमाल; बटलरची विकेट ठरली टर्निंग पॉईंट?

T20 World Cup 2024 : अक्षर पटेलने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात ड्रीम स्पेल टाकला. त्याचबरोबर महत्वाच्या 10 धावा देखील केल्या.
Axar Patel
Axar Patel IND vs ENGesakal
Updated on

Axar Patel Jos Buttler Wicket IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने ड्रीम स्पेल टाकला, त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाची गाडी रूळावर आली आणि मॅचचे रूप बदलले. 'बापू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षर पटेल याने शानदार गोलंदाजी केल्याने तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला.

टीम इंडियानं दिलेल्या १७२ रनांचं आव्हान इंग्लंड चांगल्याच प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता. जणूकाही सर्व इंग्लंडने ठरवलंय तसं होतंय. कुठेतरी वाटू लागलेलं की, २०२२ च्या सेमीफायनलची पुनरावृत्ती होतेय की काय?, कारण त्यावेळेस इंग्लंडने भारताला १० विकेट्सने मात दिली होती. अर्शदीपच्या विरोधात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर ताबडतोड फलंदाजी करत धावा वसूल करत होता. अर्शदीपविरूद्ध जॉस बटलरने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये ३ चौकारांसह १३ धावा केल्या होत्या.

Axar Patel
IND vs RSA Final Pitch Report : बॅटिंगला सोपी की बॉलर्स गाजवणार वर्चस्व... बार्बाडोसची खेळपट्टी कोणावर असते मेहरबान?

तिकडं दुसरीकडं बटलरचा फॉर्म पाहून मात्र कर्णधार रोहीत शर्माला आता पुढे काय होईल याची चिंता सतावू लागली. आता तरी अक्षर पटेलला मैदानात गोलंदाजीसाठी रोहितने उतरवावं असं सुचक वाक्य कॉमेंटेटर नवजोत सिद्धू करीत होते आणि तेवढ्यात रोहितने अक्षरच्या हातात चेंडू दिला. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणाऱ्या अक्षरसमोर अडचणींचा डोंगर होता.

फक्त दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागणार होते. त्यात इंग्लंडचे फलंदाज स्विप अन् रिव्हर्स स्विपचा सढळ हाताने वापर करणार होते.

त्यात अक्षरने त्याचा पहिला बॉल टाकला, जसं अपेक्षित होतं तसंच बटलरनं पहिलाच चेंडू रिव्हर्स स्विप मारला. लेफ्ट आर्म स्पिनरला रिव्हर्स स्विप मारणं सोपं असतं कारण चेंडू स्पिन होऊन बॅट्समनच्या विरूद्ध दिशेला जात असतो. त्यामुळं फलंदाजाला हात खोलणं सोपं होतं.

मात्र अक्षरनं चलाखीनं बॉल लेग स्टम्पवर टाकला. त्यात अक्षरचा चेंडू फार टर्न होत नाही अँगल होऊन आत येतो. खेळपट्टी संथ होती. अक्षरचा बॉल बटलरच्या बॅटच्या टो ला लागला अन् हवेत उडाला. ऋषभ पंतनं संधी ओळखली अन् बॉल अलगद ग्लोव्हजमध्ये पकडला.

Axar Patel
Shafali Verma : 20 वर्षाच्या शफालीनं केला मोठा धमाका; ठोकलं महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात वेगवान द्विशतक

हाच तो बॉल आणि हीच ती विकेट ... आता पूर्ण सामना टीम इंडियाच्या खिशात आला. 2022 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये बटलरने 49 चेंडूवर 80 धावांची खेळी करून भारताला विजयापासून दूर ठेवले होते.

अक्षरने घेतली पहिल्या चेंडूवर विकेट

भारत ज्या विकेटची वाट बघत होता ती विकेट अक्षरच्या स्वरूपानं भारताला मिळाली, आणि ही मॅचची चौथी ओवर होती. कर्णधराची विकेट घेतल्यावर अक्षरचा दुसऱ्या षटकात जॉनी बेयरस्टो बळी ठरला. त्यानंतर सुद्धा तिसरी विकेटही अक्षरनेच घेतली. अक्षरने ४ षटकांमध्ये २३ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.

टी -२० वर्ल्डकप २०२४ मधील कामगिरी

अक्षर पटेलसाठी हा वर्ल्डकप शानदार ठरला. त्याने ऑस्ट्रेलयाविरुद्धच्या सुपर ८ मधील सामना ज्यामध्ये त्याने मिचेल मार्शचा चेंडू झेलला आणि तिथूनच सामना फिरला. सोबतच, त्याने पाकिस्तानच्या विरोधात १८ चेंडूमध्ये २० धावांची गरज होती तिथे सुद्धा त्याची खेळी उल्लेखनीय ठरली, आणि त्या मॅचमध्ये सुद्धा एक विकेट मिळवून दिली होती. एकूणच काय तर अक्षर भारतीय टीमसाठी 'हिरो' ठरत आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये १५.५० च्या सरासरीने आणि ६.८८ ची इकॉनॉमी रेट ठेऊन ८ विकेट्स मिळवल्या, मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करत ४५ धावा सुद्धा बनवल्या.

अक्षरचं इंटरनॅशनल क्रिकेट करियर

१४ टेस्ट , ५५ विकेट्स, ६४६ धावा.

६७ वनडे, ६० विकेट्स, ४८९ धावा.

५९ टी-२०, ५७ विकेट्स, 406 धावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.