T20 World Cup 2024 Super 8 : बांगलादेशची थाटात सुपर-8 मध्ये एंट्री! रोमहर्षक सामन्यात नेपाळला पाजले पाणी; नेदरलँड्सचे स्वप्न भंगले

Bangladesh beat Nepal by 21 runs : बांगलादेश क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. बांगलादेश संघाने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला आणि यासह त्यांचे सुपर-8मधील स्थानही निश्चित झाले.
Bangladesh beat Nepal by 21 runs
Bangladesh beat Nepal by 21 runssakal
Updated on

T20 World Cup 2024 Super 8 : बांगलादेश क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. बांगलादेश संघाने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला आणि यासह त्यांचे सुपर-8मधील स्थानही निश्चित झाले.

बांगलादेशचा संघ 19.3 षटकांत 106 धावा करू शकला. मात्र, प्रत्युत्तर नेपाळ संघाला 19.2 षटकांत केवळ 85 धावा करता आल्या. बांगलादेशच्या या विजयाचा अर्थ नेदरलँडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नेदरलँड्सने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना पुढे जाता येणार नाही.

Bangladesh beat Nepal by 21 runs
Virat Kohli : 1, 4, 0... तीन सामन्यात फक्त 5 धावा! कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय? बॅटिंग कोच म्हणाले...

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने अवघ्या 30 धावांत 4 विकेट गमावल्या. टॉप ऑर्डरपासून मिडल ऑर्डरपर्यंत सगळेच फ्लॉप ठरले.

संघाकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 17 धावा केल्या. मात्र, ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावत राहिल्याने बांगलादेश संघ 106 धावांवर ऑलआऊट झाला. नेपाळकडून चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. संदीप लामिछानेनेही दोन गडी बाद केले.

Bangladesh beat Nepal by 21 runs
India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळनेही सातत्याने विकेट गमावल्या आणि निम्मा संघ केवळ 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, त्यानंतर कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी सहाव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करून आशा उंचावल्या. मल्लाने 27 तर दीपेंद्रने 25 धावा केल्या. मात्र, तो बाद झाल्यानंतर नेपाळचा पराभव निश्चित झाला.

बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 2 मेडन्स ठेवत फक्त 7 धावांत 4 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमाननेही 4 षटकात 1 मेडन टाकत अवघ्या 7 धावांत 3 बळी घेतले. या विजयासह बांगलादेश संघानेही पुढील फेरी गाठली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()