India Head Coach: गंभीरसाठी कभी खुशी कभी गम! टीम इंडियाच्या 'हेड कोच' निवडीत आला नवा ट्विस्ट?

Gautam Gambhir and WV Raman India Head Coach: दिग्गज राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे आणि त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
Gautam Gambhir and WV Raman India Head Coach
Gautam Gambhir and WV Raman India Head CoacheSakal
Updated on

India Head Coach latest Update: दिग्गज राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे आणि त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. या शर्यतीत टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी त्यांची मुलाखत घेतली.

Gautam Gambhir and WV Raman India Head Coach
England vs West Indies: फिल सॉल्टचा तांडव! कॅरिबियनच्या गाडीला लागला 'ब्रेक'; सुपर-8 मध्ये चॅम्पियन इंग्लंडचा मोठा विजय

यासोबतच डब्लू व्ही रमण यांचीही मुलाखत घेतल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर रमण या पदासाठी गौतम गंभीरला टक्कर देत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या 'हेड कोच' निवडीत आता नवा ट्विस्ट आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गौतम गंभीर आणि WV रमन या दोघांना भारतीय पुरुष क्रिकेट संघातील मुख्य प्रशिक्षक भूमिकांसाठी नियुक्त करण्याचा विचार करत आहे. या रणनीतीचे उद्देश म्हणजे दोन्ही माजी क्रिकेटपटूंच्या अनुभवांचा फायदा घेण्याचा आहे.

Gautam Gambhir and WV Raman India Head Coach
Team Head Coach : बोर्डाची मोठी घोषणा! टी-20 वर्ल्ड कपदरम्यान बदलला संघाचा हेड कोच; भारत-झिम्बाब्वे मालिकेत सांभाळणार कमान

28 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या डब्ल्यू.व्ही.रामन यांना कोचिंगचा अनुभव आहे. त्याची कोचिंग कारकीर्द तामिळनाडू आणि बंगालसारख्या देशांतर्गत संघांसह चांगली कामगिरी केली. यासोबत आयपीएलमध्ये पंजाब फ्रँचायझी आणि कोलकाता नाइट रायडर्ससह काम केले आहे.

यासोबत त्याने 2018 ते 2021 पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. यासोबत गौतम गंभीरने 2013 मध्ये पुन्हा फॉर्म मिळविण्यासाठी रमनची मदत घेतली आणि नंतर 2014 मध्ये जेव्हा संघाने IPL विजेतेपद जिंकले. तेव्हा त्यांनी KKR येथे एकत्र काम केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.