IPL Retention 2025 Hardik Pandya : इंडियन प्रीमिअर लीगमधील दहा फ्रँचायझींना त्यांच्या संघात कोणत्या सहा खेळाडूंना कायम राखले आहे, याची यादी उद्यापर्यंत आयपीएलकडे सोपवायची आहे. Mumbai Indians हा नेहमी चर्चेत असलेला संघ कोणत्या सहा खेळाडूंना कायम राखतो याची उत्सुकता आहे. मागील पर्वात त्यांनी रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली आणि हार्दिक पांड्याकडे सोपवली. त्यामुळे चाहत्यांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला आणि त्यात संघाची कामगरिही निराशाजनक राहिली. त्यामुळे यंदाच्या पर्वात फ्रँचायझी ही चूक सुधारतील अशी आशा आहे. हार्दिककडून नेतृत्व काढून ते सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याचा अंदाज आहे.