Champions Trophy 2025 : 9 महिन्यांनंतर IND vs PAK पुन्हा भिडणार लाहोरमध्ये! BCCIच्या 'त्या' निर्णयाची प्रतीक्षा

पाकिस्तानात खेळण्यासाठी केंद्र सरकारकडून भारताच्या टीम इंडियाला अद्याप परवानगी देण्यात आली नसली, तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून चॅम्पियन्स करंडकाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
champions trophy 2025 schedule ind vs pak
champions trophy 2025 schedule ind vs paksakal
Updated on

India vs Pakistan Champions Trophy 2025 : पाकिस्तानात खेळण्यासाठी केंद्र सरकारकडून भारताच्या टीम इंडियाला अद्याप परवानगी देण्यात आली नसली, तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून चॅम्पियन्स करंडकाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना १ मार्च २०२५ रोजी लाहोर येथे होणार आहे; मात्र पाकिस्तानकडून तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकाला बीसीसीआयकडून अद्याप संमती देण्यात आलेली नाही, अशी माहिती आयसीसीच्या सदस्याकडून बुधवारी देण्यात आली.

champions trophy 2025 schedule ind vs pak
Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

आयसीसीच्या सदस्याकडून पुढे सांगण्यात आले की, पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून चॅम्पियन्स करंडकातील १५ सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सात सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराचीमध्ये आणि पाच सामने रावळपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचा उद्‌घाटनीय सामना कराचीत खेळवण्याचा प्रस्ताव आहे. कराची व रावळपिंडी येथे उपांत्य सामने होतील. लाहोरमध्ये जेतेपदाची लढत रंगेल. तसेच भारतीय संघाच्या सर्व लढती सुरक्षेच्या कारणास्तव लाहोरमध्ये पार पडणार आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास तीही लढत लाहोरमध्ये पार पडेल.

champions trophy 2025 schedule ind vs pak
Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी; Video

पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात

केंद्र सरकारकडून भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्‍नचिन्ह आहे; तरीही १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न आहे. १० मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. भारत व पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात असून या दोन देशांसह बांगलादेश व न्यूझीलंड या देशांचाही अ गटात समावेश आहे. ब गटामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या परवानगीनंतर सहभाग

चॅम्पियन्स करंडकात सहभागी होत असलेल्या सर्व संघांच्या मंडळांकडून चॅम्पियन्स करंडकाच्या पाकिस्तानातील आयोजनाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अद्याप होकार कळवण्यात आलेला नाही. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. कोणत्याही मंडळाला सरकारच्या विरोधात जाण्यासाठी दबाव टाकण्यात येणार नाही, अशी भूमिका आयसीसीकडून घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.