T20 World Cup: आऊट ऑफ फॉर्म पांड्या, चार स्पिनर अन् रिंकूवर अन्याय... सगळ्या टीका सहन करत आगरकरने रोहितला दिली चॅम्पियन टीम

Ajit Agarkar: साल 2007 मधील विश्वविजेता खेळाडू ते चिफ सिलेक्टर, टीम इंडियाच्या यशात अजित आगरकरचं असंही योगदान
Ajit Agarkar | Rohit Sharma
Ajit Agarkar | Rohit SharmaSakal

T20 World Cup 2024, India vs South Africa: भारतीय संघ गेल्या १३ महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी शनिवारी मैदानात उतरणार आहे. भारताला शनिवारी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.

दरम्यान, भारताने यंद्याच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत पूर्णपणे वर्चस्व ठेवल्याचे दिसत आहे. भारताने खेळलेले सर्व ७ सामने जिंकले आहेत. भारताला आत्तापर्यंत जे यश मिळालंय, त्याचं महत्त्वाचं कारण संघात दिसणारा समतोलपणा, याला अनेकांनी दिलंय आणि पाहायला गेलं तर ते खरंही आहे.

भारतीय संघासाठी समतोलच सर्वात मोठी ताकद ठरत आहे. या समतोलपणामुळेत भारतीय संघ कठीण परिस्थितीत अडकल्यानंतरही सहज बाहेर पडली आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर अमेरिकेत कठीण खेळपट्ट्यांवर भारताच्या फलंदाजांचं टीम वर्क आणि वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांची जादू सर्व काही सांगून जाते.

पण यामागं कोणाचं मोठं योगदान असेल, तर ते अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचं. एका मोठ्या स्पर्धेसाठी योग्य संघनिवडही महत्त्वाची असते, हे यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये दिसून आलं आहे.

आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचं मोठं योगदान

एप्रिल महिन्याच्या अखेरीस अजित आगरकरने टी२० वर्ल्ड कप २०२४ साठी संघ घोषित केला. हा संघ निवडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थितही करण्यात आले, पण त्यांची उत्तरंही आगरकरने संघ घोषणेच्या पत्रकार परिषदेत ठामपणे दिली होती.

आगरकरने हा संघ निवडताना फॉर्म, परिस्थिती, गरज या सर्व गोष्टींचा विचार करून संघात खेळाडूंना स्थान दिलं. यावेळी काही कठीण निर्णयही घ्यावे लागले, पण शेवटी संघाचा समतोल महत्त्वाचा होता.

रिंकु सिंग आणि शिवम दुबे यांच्यातील एकाला निवडायचे होते, त्यावेळी शिवमच्या आयपीएलमधील फॉर्मचा आणि गरजेला त्याची गोलंदाजी महत्त्वाची ठरू शकते हा विचार करून त्याला पसंती देण्यात आली. पण फक्त फॉर्मचाच विचार करण्यात आला का तर तसंही नव्हतं कारण तसं झालं असतं तर यशस्वी जैस्वाल संघात नसता.

कारण जैस्वाल आयपीएलमध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. पण असं असलं तरी त्याची क्षमता ओळखून आणि तो डावखुरा फलंदाज असल्याचा विचार करत त्याला संधी देण्यात आली. यावेळी शुभमन गिलला बाहेर ठेवण्याचा कठीण निर्णयही घेण्यात आला.

केएल राहुलबाबतही संघाचा समतोल राखण्याचा विचार झाला. केएल राहुल आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनीही यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती. अशावेळी केएल राहुलला बाहेर ठेवण्याचा अवघड निर्णय आगरकरला घ्यावा लागला.

त्याला बाहेर ठेवण्याचं कारण सांगताना आगरकरने असंही सांगितलं की संघाला मधल्या फळीत खेळायला फलंदाज हवा होता, केएलने गेल्या काही दिवसात वरच्या फळीत फलंदाजी केली आहे आणि त्यांना वाटलं की टी२० वर्ल्ड कपसाठी संजू सॅमसन अधिक योग्य होता. तसेच ऋषभ पंतने १६ महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नसतानाही त्याला संधी देण्याची जोखीमही आगरकरने घेतली. महत्त्वाचे म्हणजे पंतनेही त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.

Ajit Agarkar | Rohit Sharma
T20 World Cup 2024: ऑलराऊंडरची ताकद ते सांघिक कामगिरी... 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया जिंकू शकते वर्ल्ड कप

स्वत: अष्टपैलू खेळाडू...

आगरकर स्वत: अष्टपैलू आहे. त्यामुळे त्याला अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्वही माहित आहे. अष्टपैलू खेळाडू संघात समतोल राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो, हे वर्षानुवर्षे सिद्ध होत आलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेत निवड समितीने हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या चार अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली.

हार्दिक आणि अक्षर यांना फॉर्मचं कारण देत संधी देण्याबाबत अनेकांनी प्रश्न विचारले. पण अजित आगरकरने याचं उत्तर देताना सांगितलं की अष्टपैलू संघात असताना एक ज्यादाचा गोलंदाज खेळवण्याचा पर्याय मिळतो. या निर्णयाचे परिणाम टी२० वर्ल्ड कपमध्ये दिसले.

भारताने चारही अष्टपैलू खेळाडूंना आत्तापर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवलं. त्यामुळे भारताकडे ८ व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीचे पर्याय राहिले, तसेच फलंदाजी क्रमवारीत गरज पडेल तेव्हा बदल करण्याचं स्वातंत्र्यही मिळालं.

पाकिस्तानविरुद्धचा सामना आठवत असेल, तर अक्षरने चौथ्या क्रमांकावर येत केलेल्या २० धावांही किती महत्त्वाच्या ठरल्या, हे देखील लक्षात येईल. जडेजाने विकेट्स मिळवल्या नसल्या, तरी केलेली किफायतशीर गोलंदाजीही महत्त्वाची ठरली. हार्दिकने तर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चांगली कामगिरी केली. यातील शिवम आणि हार्दिक वेगवान, तर जडेजा आणि अक्षर फिरकी गोलंदाज असल्याने भारताला गोलंदाजांच्या पर्यायांची कमतरता जाणवली नाही.

Ajit Agarkar | Rohit Sharma
Video: सचिन तेंडुलकरने ज्या कॅचचं केलं भरभरून कौतुक, त्यासाठी अक्षरला Team India च्या ड्रेसिंग रुममध्ये मिळालं मोठं बक्षीस

चार फिरकी गोलंदाजांना का संधी?

संघ निवडताना आणखी एका गोष्टीचा विचार झाला, तो म्हणजे परिस्थिती आणि गरज भारताला स्थानिक वेळेनुसार सर्व सामने सकाळी खेळायचे होते, तसेच वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीला बऱ्याचदा मदतही करतात.

त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करताना निवड समितीने चार फिरकीपटू संघात ठेवण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच जणांना हा निर्णय पटला नव्हता. पण संघाची गरज वेस्ट इंडिजमध्ये काय आहे, याचाच विचार करत घेतलेला हा निर्णय होता.

एकुणच या सर्व गोष्टींचा विचार केला, तर आगरकरच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या या संघ उत्तम आहे, हे आत्तापर्यंतही दिसून आलं आहे.

२००७ चा विश्वविजेता खेळाडू

आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की २००७ मध्ये पहिल्या टी२० वर्ल्ड कपचा जिंकलेल्या भारतीय संघात अजित आगकरही होता. याच संघात रोहित शर्माही होता.

विशेष म्हणजे २०२४ चा संघ निवडताना २००७ च्या त्या संघातील या दोन खेळाडूंचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणार का हे पाहावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com