T20 World Cup 2024: भारताच्या विश्वविजयाचा आनंद! क्रिकेटवेड्या अझहरने 'असा' फेडला नवस

India win T20 World Cup 2024: १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कोडकौतुक देशभर सुरू असून एका क्रिकेटवेड्या चाहत्याने संघासाठी बोललेला नवस नुकताच पूर्ण केला.
Team India | T20 World Cup 2024
Team India | T20 World Cup 2024Sakal
Updated on

T20 World Cup 2024: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) टी-२० विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं.

तब्बल १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कोडकौतुक देशभर सुरू आहे. सांगलीतील एका क्रिकेटवेड्याने संघासाठी बोललेला नवस आज पूर्ण केला.

Team India | T20 World Cup 2024
Viral Video: 35,000 फूट उंचीवर भारताच्या T20 विश्वचषक विजयाचे हटके सेलीब्रेशन, पाहा व्हिडिओ

गणेशनगर येथील अझहर लंबे या युवकाने मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यापर्यंत अनवाणी जाऊन हा नवस पूर्ण केला. संघाच्या यशासाठी केलेल्या नवसाची फेड करताना अझहरने समाधान व्यक्त केले.

टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची सुरवातीपासूनची कामगिरी दर्जेदार होती. उपांत्य सामना खिशात घालताना संघाने चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले होते. टी-२० स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपावा, भारतीय संघाला यंदाचा विश्वकरंडक मिळावा, यासाठी अझहरने मिरासाहेब दर्ग्याला नवस बोलला होता.

Team India | T20 World Cup 2024
T20 World Cup:16 वर्ष, 9 महिने अन् 5 दिवस...भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट; दिला खास सल्ला

अंतिम सामन्यात मात्र प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघाने कमी धावसंख्येवर रोखल्याने चिंता वाढली होती. मात्र, सूर्यकुमार यादवच्या अप्रतिम झेलने हा सामना फिरला. तेव्हा अझहर लंबे व त्याच्या मित्र मंडळींनी जल्लोष केला.

आज सकाळी अझहरने सांगलीतील गणेशनगर येथून विश्वचषकाची प्रतिकृती हातात घेत मिरजेच्या दिशेने अनवाणी प्रवास सुरू केला. मिरजेतील मिरासाब दर्ग्याजवळ आल्यानंतर दर्गा खादीमतर्फे असगर शरीकमसलत यांनी त्याचा सत्कार करून या नवसफेडीसाठी शुभेच्छा दिल्या. दर्ग्यात जाऊन त्याने साकडे घालत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.