T20 World Cup 2024 SA vs ENG : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या सुपर-8 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. पण या सामन्यात आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूला शिक्षा केली आहे. हा खेळाडू आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यानंतर आयसीसीने या खेळाडूवर कारवाई केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड मिलरने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मिलर आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. एवढेच नाही तर मिलरला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निवेदन जारी करून याला दुजोरा दिला आहे. आयसीसीने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हिड मिलर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे, त्यामुळे या खेळाडूला फटकारण्यात आले आहे.
ही घटना १९व्या षटकात घडली
इंग्लंडकडून सॅम करन 19 वे षटक टाकत होता. त्यावेळी त्याने डेव्हिड मिलरला एक टॉस बॉल टाकला. ज्यावर मिलरने नो बॉलची मागणी केली होती. पण अंपायरने तो नो बॉल दिला नाही. यानंतर मिलरनेही पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. डेव्हिड मिलरवर हा आरोप फील्ड अंपायर ख्रिस ब्राउन आणि शराफुद्दौला शाहिद आणि थर्ड अंपायर जोएल विल्सन यांनी लावला होता, त्यानंतर मिलरनेही आपला गुन्हा मान्य केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.