David Warner Retire: ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधून एक्झिट होताच डेव्हिड वॉर्नरने घेतली निवृत्ती

David Warner Retirement: अफगाणिस्तान - बांगलादेश सामन्याच्या निकालाने एका दर्जेदार क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली.
David Warner
David Warner Retirement esakal
Updated on

David Warner Retirement: अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करताच ऑस्ट्रेलियाचे टी 20 वर्ल्डकप 2024 मधील आव्हान संपुष्टात आले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपली 15 वर्षाची दैदिप्यमान कारकीर्द संपवली.

David Warner
Rashid Khan : दुसरी धाव नाकारली, कर्णधार राशिदने बॅटच फेकली... एवढंच नाही अफगाणिस्तान संघाचे अनेक Video होतायत ट्रेंड

वॉर्नरची तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती

डेव्हिड वॉर्नरची वनडे कारकीर्द ही वर्ल्डकप विजयाने संपली. भारतात गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. डेव्हिड वॉर्नर हा वनडे वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती झाला.

त्याने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यानंतर कसोटीमधून निवृत्ती घेतली होती. आता टी 20 वर्ल्डकपनंतर तो टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सेमी फायनल गाठली. ऑस्ट्रेलियाचे टी 20 वर्ल्डकप 2024 मधील आव्हान संपुष्टात आले.

ऑस्ट्रेलियाचा सुपर 8 मध्ये भारताने पराभव केला होता. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरचा तो शेवटचा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना ठरला.

David Warner
AFG vs BAN : अफगाणी भाबडेपणा! कोच ट्रॉटचा इशारा अन् स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीननं थेट पायच धरला; Video व्हायरल

शेवटच्या सामन्यात भारताविरूद्ध डेव्हिड वॉर्नरला फक्त 6 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने त्याला अप्रतिम स्विंग गोलंदाजीवर बाद केलं. वॉर्नर बाद होऊन बाहेर जात असताना हा ऑस्ट्रेलियाकडून त्याचा शेवटचा सामना असल्याची जाणीव त्याला झाली नसेल.

तो बाद झाल्यावर मैदानावर कोणतंही निरोपाचं वातावरण नव्हतं. त्याला स्टँडिंग ओवेशन मिळालं नाही. मात्र अफगाणिस्तानने सामना जिंकताच वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.