Dinesh Karthik returns to RCB : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या संपल्यानंतर आयपीएल 2025 बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आगामी आयपीएल आधी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे.
आरसीबीने संघाचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.
दिनेश कार्तिक आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ही दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर त्याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर अवघ्या एक महिन्यानंतर तो आरसीबीमध्ये परतला आहे. अशा परिस्थितीत त्याला ही जबाबदारी मिळणे ही मोठी गोष्ट आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या अधिकृत X खात्याद्वारे दिनेश कार्तिकला फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याची माहिती शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये माहिती देताना आरसीबीने लिहिले की, 'आमच्या कीपरचे स्वागत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू येथे दिनेश कार्तिक अगदी नवीन अवतारात परतला. दिनेश हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असतील.
दिनेश कार्तिकने आरसीबीमध्ये परत येताच चाहत्यांना खास संदेश दिला. तो म्हणाला की, खेळत असताना त्याचा संघ ट्रॉफीच्या जवळ आला, पण तो कधीही जिंकू शकला नाही. पण यावेळी आता फलंदाजी प्रशिक्षक म्हणून यावेळी आरसीबी जिंकवणार यासाठी त्याने चाहत्यांचा पाठिंबा मागितला.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यात दिनेश कार्तिकने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 16 डावात 183 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले असून यादरम्यान त्याने 22 अर्धशतकांसह 4842 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.