ENG vs WI : माजी अन्‌ गतविजेत्यांमध्ये संघर्ष! इंग्लंड-वेस्ट इंडीज आज ‘सुपर आठ’ फेरीत झुंजणार

England v West Indies T20 World Cup 2024 : गतविजेता इंग्लंडचा संघ आणि माजी विजेता वेस्ट इंडीजचा संघ यांच्यामध्ये आज (ता. २०) टी-२० विश्‍वकरंडकातील ‘सुपर आठ’ फेरीतील गट दोनमधील लढत रंगणार आहे.
England v West Indies T20 World Cup 2024
England v West Indies T20 World Cup 2024sakal
Updated on

England v West Indies T20 World Cup 2024 : गतविजेता इंग्लंडचा संघ आणि माजी विजेता वेस्ट इंडीजचा संघ यांच्यामध्ये आज (ता. २०) टी-२० विश्‍वकरंडकातील ‘सुपर आठ’ फेरीतील गट दोनमधील लढत रंगणार आहे. यजमान वेस्ट इंडीज संघाने साखळी फेरीतील क गटामध्ये चारही लढतींमध्ये विजय मिळवत अगदी रुबाबात पुढल्या फेरीत प्रवेश केला.

इंग्लंड संघाला मात्र पुढल्या फेरीत प्रवेश करण्यासाठी अखेरच्या लढतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नामिबिया संघावर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा पुढल्या फेरीतील मार्ग मोकळा झाला, त्यामुळे सध्या तरी वेस्ट इंडीजचे पारडे जड समजले जात आहे.

इंग्लंडच्या संघाला ‘सुपर आठ’ फेरीच्या लढतींमध्ये आपला खेळ उंचवावा लागणार आहे. फिल सॉल्ट, जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक यांना फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे. जोफ्रा आर्चर, सॅम करन, अदिल रशीद, मोईन अली व रीस टॉपले यांना वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

वेस्ट इंडीज संघाच्या फलंदाजीची मदार निकोलस पूरन, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, रोवमॅन पॉवेल, आंद्र रसेल यांच्या खांद्यावर असणार आहे. अकील होसेन, गुदाकेश मोती, ओबेड मॅकॉय, अल्जारी जोसेफ यांना गोलंदाजीत ठसा उमटवावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बाबी

  • - इंग्लंडच्या संघाने सेंट लुशिया क्रिकेट स्टेडियममध्ये तीन टी-२० लढती खेळल्या आहेत. या तीनही लढतींमध्ये इंग्लंड संघाने विजय मिळवले आहेत. इंग्लंडने २०१०मध्ये वेस्ट इंडीज येथे झालेल्या टी-२० विश्‍वकरंडकाचे अजिंक्यपद पटकावले होते. या विश्‍वकरंडकातील सेंट लुशिया येथे झालेल्या दोन लढतींमध्ये इंग्लंडने यश मिळवले होते. त्यानंतर २०१९मध्ये इंग्लंडने वेस्ट इंडीजला येथे पराभूत केले.

  • - वेस्ट इंडीजने येथे झालेल्या २१ टी-२० सामन्यांपैकी १० सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यांत त्यांनी विजय साकारले आहेत. मागील सहापैकी पाच लढतींमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.

  • - २०२३मधील डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडीज-इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका वेस्ट इंडीजमध्ये खेळवण्यात आली होती. उभय देशांमधील ही मालिका रोमहर्षक झाली. वेस्ट इंडीजने अखेरच्या सामन्यात विजय मिळवत ही मालिका ३-२ अशी खिशात घातली.

या खेळपट्टीत दडलंय काय?

वेस्ट इंडीज-अफगाणिस्तान यांच्यामधील साखळी फेरीचा सामना सेंट लुशिया येथे मंगळवारी पार पडला. वेस्ट इंडीज संघाने येथील खेळपट्टीवर २१८ धावांचा पाऊस पाडला. अफगाणिस्तानचा संघ ११४ धावांवरच गारद झाला. येथील खेळपट्टीवर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असेल. या खेळपट्टीवर पुन्हा धावाच धावा उभारल्या जाण्याची शक्यता आहे.

यजमानांचे पारडे जड

वेस्ट इंडीज-इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत २९ टी-२० लढती पार पडल्या आहेत. वेस्ट इंडीजने १७ लढती जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इंग्लंडला १२ लढती जिंकता आलेल्या आहेत. दोन देशांमध्ये झालेल्या लढतींच्या निकषावर वेस्ट इंडीजचे पारडे जड आहे, असे प्रकर्षाने दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.