Euro Cup 2024 Football : वादळी पावसानंतर जर्मनीचा धडाका! यजमानांची डेन्मार्कवर मात; गतविजेते इटली गारद

जोरदार वादळी पावसामुळे सामन्याच्या ३५ व्या मिनिटानंतर खेळ सुमारे २० मिनिटे खंडित झाला, नंतर लढतीस पुन्हा सुरुवात झाल्यानंतर जर्मनीचा धडाका दिसला.
Euro Cup 2024 Germany beat Denmark
Euro Cup 2024 Germany beat Denmarksakal
Updated on

Euro Cup 2024 Football : जोरदार वादळी पावसामुळे सामन्याच्या ३५ व्या मिनिटानंतर खेळ सुमारे २० मिनिटे खंडित झाला, नंतर लढतीस पुन्हा सुरुवात झाल्यानंतर जर्मनीचा धडाका दिसला. त्या बळावर यजमानांनी डेन्मार्कला २-० असे हरवून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

त्यापूर्वी, बर्लिन येथे झालेल्या राऊंड ऑफ १६ फेरीत स्वित्झर्लंडने २-० असा सनसनाटी निकाल नोंदवत गतविजेत्या इटलीला स्पर्धेतून गारद केले. रेमो फ्रॉयलर याने ३७ व्या, तर ४६ व्या मिनिटास रुबेन व्हारगास याने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर स्वित्झर्लंडने उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांचा पुढील सामना इंग्लंड व स्लोव्हाकिया यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.

Euro Cup 2024 Germany beat Denmark
Indian Cricket Team: टीम इंडिया बार्बोडोसमध्ये अडकली! इच्छा असतानाही मायदेशी परतता येईना, कारण आलं समोर

डॉर्टमंड येथे खराब हवामानानंतर पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर जर्मनीने आक्रमक खेळ केला. ५० व्या मिनिटास डेन्मार्कच्या ज्योकिम अँडरसन याचा गोल अवैध ठरला व गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. त्यानंतर जर्मनीने जोरदार मुसंडी मारली. अँडरसन याच्याच गोलक्षेत्रातील हँडबॉलमुळे यजमान संघाला पेनल्टी फटका मिळाला.

५४ व्या मिनिटास काय हावर्त्झ याने अचूक नेम साधताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक कास्पर श्यामकल याला चकविले. ६८ व्या मिनिटास २१ वर्षीय जमाल मुसियाला याच्या जबरदस्त गोलच्या बळावर जर्मनीची आघाडी वाढली. निको श्लोटरबेक याने दूरवरून दिलेल्या चेंडूवर मुसियाला याने स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल केला. तीन वेळच्या माजी विजेत्या जर्मनीची पुढील लढत आता स्पेन व जॉर्जिया यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.

Euro Cup 2024 Germany beat Denmark
T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

आकडेवारीत जर्मनी-डेन्मार्क सामना

- यंदाच्या युरो स्पर्धेत जर्मनीच्या जमाल मुसियाला याचे ४ सामन्यांत ३ गोल

- युरो करंडकात कमी वयात तीन गोल करणारा मुसियाला (२१ वर्षे १२४ दिवस) इंग्लंडच्या वेन रुनी (१८ वर्षे २४१ दिवस) यांच्यानंतर दुसरा खेळाडू

- काई हावेर्त्झ याचे जर्मनीतर्फे ५० लढतीत १८ गोल, यंदा युरो करंडकात एकूण दोन गोल

- डेन्मार्क आता प्रमुख स्पर्धेत आठ सामने विजयाविना (चार बरोबरीत, चार पराभव)

``सामना रुक्ष होता. पहिल्या २० मिनिटांत आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळ केला. त्यानंतर वादळ आले, नंतर आम्हाला वाटले की आम्ही मागे पडलोय, पण आम्ही मुसंडी मारली. स्पॉटवरून काई याने चांगला नेम साधला. स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीप्रमाणेच चाहत्यांच्या मदतीने आम्ही प्रतिकूलतेतून पुढे आलो. संघाचा मला अभिमान वाटतो. ते खरोखरच किती उत्कृष्ट आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे.``

- ज्युलियान नागल्समन, जर्मनीचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.