Team India Arrival Wankhede : विश्वविजेत्यांना पाहण्यासाठी वानखेडेवर चाहत्यांना मोफत प्रवेश; मात्र पाऊस उत्साहावर फेरणार पाणी?

Team India Arrival Wankhede : टीम इंडियाचे वानखेडे स्टेडियमवर आगमन होणार आहे. चाहत्यांना हे आगमन मोफत पाहावयास मिळणार आहे.
Team India
Team India Arrival Wankhede esakal
Updated on

Team India Arrival Wankhede : भारताने वेस्ट इंडीजमध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर तब्बल चार दिवसांनी त्यांचे भारतात आगमन झाले. भारतीय संघ दिल्लीच्या विमानतळावर पोहचला. तेथे चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटला. यानंतर संघ मुंबईसाठी रवाना होईल. तेथे भारतीय संघांची ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीची सांगता ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होईल.

Team India
Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडेवरच्या सोहळ्यासाठी चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. त्यांनी हा सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांना फ्री एन्ट्री असेल असे घोषित केले. त्यामुळे टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी वानखेडे खचाखच भरण्याची शक्यता आहे. वानखेडेचे गेट हे दुपारी 4 वाजता उघडण्यात येणार आहेत. एमसीएने पोलीस प्रशासनाला देखील तगडा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.

एमसीएने ट्विट केले की, 'एमसीएने लोकांसाठी चांगली तयारी केली आहे. मुंबई पोलीस आणि बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगली तयारी केली आहे. आम्ही चाहत्यांना वानखेडेवर मोफत प्रवेश देणार असून प्रथम येणाऱ्याला प्रथम संधी असेल. आम्ही आज टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.'

Team India
Team India Arrival : पंतप्रधानांच्या भेटीवेळी टीम इंडियानं घातली खास 'चॅम्पियन्स' जर्सी

मात्र या सर्व सेलिब्रेशनवर पावसाचे पाणी फिरण्याची शक्यता आहे. वातावरणाच्या अंदाजानुसार या भागात 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयी मिरवणुकीच्या सेलिब्रेशनवर पावसाचे पाणी फिरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.