Gautam Gambhir Team India Head Coach : भारतीय वरिष्ठ पुरूष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आज बीसीसीआयने मुलाखती घेतल्या. टीम इंडियाचा पुढचा हेड कोच म्हणून चर्चेत असलेला गौतम गंभीरने देखील मुलाखत दिली. मात्र या मुलाखतीवेळी एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी फक्त गौतम गंभीरनेच अर्ज केलेला नाही तर वी व्ही रमन यांनी देखील अर्ज केला आहे. क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीच्या पहिल्या फेरीत रमन सर्वांना चांगलेच प्रभावित केलं आहे.
रमन हे भारताचे माजी खेळाडू असून त्यांनी 2018 ते 2021 पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे देखील मुख्य प्रशिक्षक पद भुषवलं होतं. गंभीर आणि रमन यांनी दोघांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या मुलाखतीला व्हर्चुअली हजेरी लावली होती. क्रिकेट सल्लागार समितीत अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश आहे.
राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरचं नाव चर्चेत आहे. मात्र न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार वीव्ही रमन यांनी देखील अत्यंत सखोल प्रेझेंटेशन दिलं. यामुळं क्रिकेट सल्लागार समिती चांगलीच प्रभावित झाली आहे. बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले की रमन यांच्या प्रेझेंटेशनने त्यांचा समितीवर चांगला प्रभाव पडला आहे.
क्रिकेट सल्लागार समिती काही परदेशी प्रशिक्षकांच्या देखील मुलाखती घेणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बीसीसीआय परदेशी प्रशिक्षकासाठी उत्सुक नाही असं वक्तव्य केलं होते. यामुळे आता बीसीसीआयने आपली भुमिका बदलली आहे का? तो परदेशी प्रशिक्षक कोण? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, 'गौतम गंभीर व्हर्च्युअली मुलाखतीला हजर राहिला होता. मात्र रमन यांचे प्रेझेंटेशन खूप प्रभावी होतं. क्रिकेट सल्लागार समिती उद्या विदेशी उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत. सध्या गंभीरचं पारडं जड आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. मात्र रमनचं प्रेझेंटेशन दुर्लक्ष करण्यासारखं नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.