Team India Head Coach : आज गौतमची 'गंभीर' परीक्षा! BCCI तर्फे कोण घेणार जॉब इंटरव्ह्यु? मोठा खुलासा

Team India Head Coach Gautam Gambhir: टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे.
Team India Head Coach Gautam Gambhir
Team India Head Coach Gautam Gambhirsakal
Updated on

Gautam Gambhir Team India Head Coach : टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. या शर्यतीत माजी सलामीवीर गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, बोर्ड आज गंभीरचा इंटरव्ह्यु घेऊ शकते, असे एका अहवालातून समोर आले आहे. याशिवाय या पदासाठी अर्ज करणारा तो एकमेव व्यक्ती आहेत.

Team India Head Coach Gautam Gambhir
Satej Nazare : पुण्यातल्या आयटी मॅनेजरचा आफ्रिकेत डंका! खडतर मॅरेथॉनमध्ये बजावली अभूतपूर्व कामगिरी

मुख्य कोच बनण्याच्या चर्चेदरम्यान या अनुभवी फलंदाजाने सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गंभीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. शहा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "अलीकडील निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहाजी यांची भेट घेतली. गृहमंत्री म्हणून त्यांचे नेतृत्व आपल्या देशाची सुरक्षा आणि स्थिरता आणखी मजबूत करेल." या बैठकीनंतर चर्चेचा बाजार चांगलाच तापला आहे.

Team India Head Coach Gautam Gambhir
Pakistan World Cup 2024 : पाकिस्तानी कधी सुधारणार ? भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच झाला हतबल, सांगितले ड्रेसिंग रूममधील सत्य

दरम्यान, मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव अर्जदार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर आज झूम कॉलवर क्रिकेट सल्लागार समिती (CAC) समोर इंटरव्ह्यु देऊ शकतो. गेल्या महिन्यात, बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम तारीख 27 मे निश्चित करण्यात आली होती. नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 असा असेल.

Team India Head Coach Gautam Gambhir
WI vs AFG T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा विजयी 'चौकार'! शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. सलील अंकोला यांच्या जागी निवड समितीच्या उमेदवाराचीही आज मुलाखत होऊ शकते, असे वृत्तात म्हटले जात आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार हे निश्चित मानले जात आहे. खरं तर, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटची चांगली जाण असलेल्या दिग्गजांचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.