ICC Rule on Gulbadin Naib Injury : मंगळवारी टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 8 चा शेवटचा सामना खेळला गेला. सुपर 8 च्या या लढतीत बांगलादेशचा सामना अफगाणिस्तानशी झाला. दोन्ही संघांमधील सामन्यात अफगाणिस्तानने शानदार कामगिरी करत 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानने इतिहास रचला असून प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
मात्र, सामन्यादरम्यान गुलबदीन नैब चर्चेत होता. खरं तर सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी ड्रेसिंग रूममधून सामना स्लो करण्याचे संकेत दिले होते. गुलबदीनने कोचचा इशारा पाहताच तो मैदानात पडून जखमी झाल्याचे नाटक केले. मात्र, ही सबब करणे आता गुलबदीनला महागात पडू शकते. आयसीसी या खेळाडूवर उपांत्य फेरीच्या सामन्यातही बंदी घालू शकते.
काय आहेत आयसीसीचे नियम?
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, सामन्यात वेळ वाया घालवणे हा कलम 2.10.7 अंतर्गत लेव्हल 1 किंवा 2 गुन्हा मानला जातो. लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी मॅच फीच्या 100 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स होऊ शकतात. एखाद्या खेळाडूला वर्षातून चार वेळा डिमेरिट गुण मिळाले तर त्याला एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बंदी घातल्या जाऊ शकते.
याशिवाय, आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना नियमांच्या कलम 41.9 नुसार, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाने सामन्याचा वेळ वाया घालवल्यास पाच धावांचा दंड आकारला जाऊ शकतो. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात असे काहीही घडले नसले तरी पंचांकडून हा दंड ठोठावला जाऊ शकतो.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यापासून गुलबदीन नैबची खोटी दुखापत चर्चेचा विषय बनली आहे. ही संपूर्ण घटना बांगलादेशच्या डावाच्या 12 व्या षटकात घडली. अफगाणिस्तानसाठी नूर अहमद हे षटक टाकत होता.
या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी पाऊस येत असल्याचे पाहून मैदानाकडे बोट दाखवले आणि खेळ स्लो करण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षकाच्या संकेतानंतर, स्लिपमध्ये उभा असलेला गुलबदीन मैदानावर झोपला आणि त्याला पेटके किंवा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे दिसून आले.
मात्र, गुलबदीन नैब दुखापतीनंतर काही वेळातच मैदानात परतला आणि गोलंदाजीही केली. गुलबदीन इतक्या लवकर बरा होताना पाहून चाहते त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.