Hardik Pandya : पांड्यानं एक दम से वक्तही बदल डाला! टीकेचा धनी ठरलेल्या हार्दिकने बांगलादेशविरूद्ध इतिहास रचला

T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताकडून खेळताना इतिहास रचला. त्यानं बांगलादेशविरूद्ध बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही दमदार कामगिरी केली.
Hardik Pandya
Hardik Pandya IND vs BAN esakal
Updated on

India Vs Bangladesh : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत 196 धावा ठोकल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 27 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. या खेळीबरोबरच हार्दिक पांड्याने भारताला पहिली विकेट देखील मिळवून दिली.

या कामगिरीसोबत हार्दिक पांड्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताकडून यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याच अष्टपैलू खेळाडूने केली नव्हती.

Hardik Pandya
IND vs BAN : भारतानं मोडला 17 वर्षापूर्वीचा विक्रम; बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात पार केले अनेक माईल स्टोन

हार्दिक पांड्या हा टी 20 वर्ल्डकप इतिहासात भारताकडून 300 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 20 विकेट्स घेणारा पहिलाच अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. याचबरोबर टी 20 वर्ल्डकपमध्ये एकाच सामन्यात अर्धशतकी खेळी आणि एक विकेट घेणारा तो भारताचा विराट कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

Hardik Pandya
IND vs BAN: सूर्यकुमार आला, सिक्स मारला अन् आऊट झाला, पाहा कशी गमावली विकेट

हार्दिक पांड्याने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मध्ये पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. त्याने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात 24 चेंडूत 32 धावा केल्या आहेत. तर बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याने 24 चेंडूत नाबाद 50 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानं भारतासाठी एक विकेट देखील घेतली.

आयपीएलमध्ये हार्दिकला ना बॅटिंगमध्ये ना बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करता आली. तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार देखील होता. मात्र मुंबईला ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र टी 20 वर्ल्डकप येतात हार्दिक आपल्या जुन्या रंगात अन् ढंगात आला.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com