Hardik Pandya : टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही भारतीय संघ अव्वल ठरला. विशेषत: संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या जबरदस्त फलंदाजीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची जोरदार घोषणा केली. या सामन्यात चाहत्यांना विंटेज पांड्याची झलक पाहायला मिळाली आणि त्याने षटकारांची हॅट्ट्रिकही केली.
यावेळी आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळली. फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. यामुळे त्याने पांड्याला टूर्नामेंटदरम्यान खूप ट्रोल केले. मात्र, असे असूनही पांड्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पण टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या माध्यमातून पांड्याने टीकाकारांना उत्तर देण्याचे ठरवले असावे. सराव सामन्यात पांड्या क्रीजवर आला तेव्हा तो वेगळ्याच लयीत दिसला. त्याने 17व्या षटकात तनवीर इस्लामला टारगेट केले आणि षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग 3 षटकार ठोकले. हार्दिक पांड्याने या सामन्यात 23 चेंडूत 40 धावा केल्या. आणि भारतीय संघाने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला.
भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. तर 9 जून रोज भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 12 जूनला भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. हे तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. यानंतर टीम इंडिया 15 जूनला कॅनडाचा सामना करण्यासाठी लॉडरहिलला रवाना होईल. भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.