Hardik Pandya : 'आपण त्यांना मिस करू, पण...' रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

Hardik Pandya ON Virat Kohli, Rohit Sharma Announced T20I Retirement : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनताच एकीकडे चाहते आनंदाने उड्या मारत होते... तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
hardik pandya on rohit sharma virat kohli t20i retirement
hardik pandya on rohit sharma virat kohli t20i retirementsakal
Updated on

India vs South Africa T20 World Cup Final : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनताच एकीकडे चाहते आनंदाने उड्या मारत होते... तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

आधी विराट कोहलीने सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर रोहित शर्माने टी-20I फॉरमॅटला अलविदा केला. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर मोठे वक्तव्य केले आहे

hardik pandya on rohit sharma virat kohli t20i retirement
IND VS SA : 'हा' निरोप दीर्घकाळ स्मरणात राहील! रोहित, कोहली अन् राहुल द्रविड यांच्या एका युगाचा अंत....

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, "2026 साठी अजून बराच वेळ आहे. मी रोहित आणि विराट या दोघांसाठी खूप आनंदी आहे... भारतीय क्रिकेटचे हे दोन मोठे दिग्गज. इतकी वर्षे त्याच्यासोबत खेळणे खूप छान होते. आणि त्याच वेळी, आम्ही त्यांना ही सर्वोत्तम विदाई देऊ शकलो."

hardik pandya on rohit sharma virat kohli t20i retirement
IND vs SA T20 2024 Final PHOTOS : डोळ्यात पाणी अन् विजयाचा जल्लोष.... पाहा भारतीय खेळाडूचे सेलिब्रेशन, फक्त एका क्लिकवर

रोहित शर्माच्या टी-20I निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला टी-20 संघाचे पूर्ण कर्णधारपद मिळू शकते. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिकने संघाची जबाबदारी स्वीकारली होती. या वर्ल्ड कप तो संघाचा उपकर्णधारही होता.

रोहित शर्माचा कर्णधार म्हणून प्रवास कसा होता?

रोहित शर्माने 50 व्या विजयासह त्याची टी-20 कर्णधारपदाची कारकीर्द संपवली. या फॉरमॅटमध्ये विजयी अर्धशतक करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. या यादीत त्याच्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे, ज्याने आपल्या कार्यकाळात संघाला 48 सामने जिंकून दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.