Hardik Pandya : आयपीएलचा झिरो ठरला वर्ल्डकपचा हिरो! स्पिनर्सनी घालवलं ते वेगवान गोलंदाजांनी परत मिळवलं

IND vs RSA T20 WC Final : हार्दिकची शेवटची ओव्हर अन् क्लासेनची घेतलेली विकेट भारतानं सामना तिथंच जिंकला.
Hardik Pandya
Hardik Pandya T20 World Cup 2024 esakal
Updated on

Hardik Pandya India Won T20 World 2024 : भारताने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो हार्दिक पांड्या! त्याने क्लासेनची विकेट घेतली अन् शेवटच्या षटकात 16 धावा डिफेंड केल्या. भारताच्या वर्ल्डकप विजयाचा शिल्पकार जरी हार्दिक असला तरी काही असे क्षण होते जिथे भारतानं सामना नियंत्रणात ठेवला.

हार्दिक सोबतच अर्शदीप सिंगची 19 वी ओव्हर जसप्रीत बुमराहनं टाकलेली 18 ओव्हर देखील महत्वाची ठरली. सर्वात महत्वाचा ठरला होता डेव्हिड मिलरचा सूर्यानं घेतलेला अफलातून कॅच! या कॅचनंतरच टीम इंडियाने 13 वर्षानंतर वर्ल्डकपवर नाव कोरलं.

हार्दिकनं घेतली क्लासेनची विकेट

हार्दिक पांड्याने देखील शेवटच्या 5 षटकात चांगला मारा केला. त्याने 17 व्या षटकात 4 धावा देत क्लासेनची विकेट घेतली. क्लासेनने 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. तो क्रिजवर होता तोपर्यंत सामना दक्षिण आफ्रिकेच्या कब्जात होता. मात्र हार्दिकने पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणला.

सूर्याचा कॅच

आजच्या सामन्यात सूर्याला बॅटनं फार काही करता आलं नाही. तो फक्त 3 धावा करून बाद झाला. मात्र त्यानं सामन्याचं चित्र पालटणारं काम केलं. त्यानं मिलरचा भिन्नाट झेल पकडला. तो जवळपास षटकारच होता. मात्र सूर्यानं बाऊड्री लाईनचा चेंडू आता ओढून घेत अशक्य झेल शक्य केला.

जसप्रीतची डेथ बॉलिंग

जसप्रीत बुमराहने 18 व्या षटकात मार्को येनसेनची विकेट घेतली. त्यानंतर टिच्चून मारा करत सामना बॉल टू रन आणला. बुमराहनं 18 व्या षटकात फक्त 2 धावा देत 1 विकेट घेतली. भारतानं सामन्यावर खरी पकड तिथेच मिळवली होती.

अर्शदीपची 19 वी ओव्हर

सामना ज्यावेळी बॉल टू रन आला होता त्यावेळी 19 वे षटक जे सर्वात महत्वाचे षटक होते ते कोण टाकणार असा प्रश्न होता. हार्दिक अनुभवी होता तर अर्शदीपने यापूर्वी शेवटचे षटक टाकले होते.

मात्र रोहितने अर्शदीपला 19 वी ओव्हर दिली. त्यानं आफ्रिकेला विजयासाठी 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना फक्त 4 धावा देत हार्दिकसाठी 16 धावा राखून ठेवल्या.

अक्षरची 47 धावांची खेळी

भारताच्या बॅटिंगमध्ये विराट कोहलीच्या 76 धावांची येणाऱ्या भविष्यात खूप चर्चा होणार आहे. मात्र याचबरोबर अक्षर पटेलने केलेल्या 47 धावांची केलेली खेळी फार महत्वाची होती. याच खेळीमुळं या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची अत्यंत महत्वाची भागीदारी रचली.

विराटचे अर्धशतक

भारताची अवस्था ज्यावेळी 3 बाद 34 धावा अशी झाली होती. धडाकेबाज सुरूवात करणाऱ्या विराटनं तिथून टिकून खेळत भागीदारी रचण्याची महत्वाची भुमिका बजावली. त्यानं 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यावेळी वाटलं की विराट संथ खेळतोय. मात्र अर्धशतकानंतर त्यानं गिअर बदलला अन् 59 चेंडूत 76 धावा करत भारताला 170 धावांच्या पार पोहचवण्यात मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.