Haris Rauf Viral Video: भारतीय चाहता समजून पाकिस्तानी खेळाडू गेला अंगावर धावून मात्र... Video होतोय तुफान व्हायरल

T20 World Cup 2024: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफचा फॅनसोबत वाद झाला. पत्नीने हारिसला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र...
Haris Rauf
Haris Rauf Videoesakal
Updated on

Haris Rauf Controversy Video : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफचा युएसएमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिडलेला हारिस रौऊफ हा एका चाहत्याच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हारिस रौऊफला हा चाहता इंडियन वाटला मात्र त्या चाहत्यानंच तो पाकिस्तानच असल्याचा खुसाला केला अन् हारिस रौऊफ तोंडघशी पडला.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधूनच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. दरम्यान, संघातील खेळाडू हे अजूनही युएसएमध्येच आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफ हा आपल्या पत्नीसोबत युएसएमध्ये भटकंती करत होता. त्यावेळी काही चाहते आणि हारिसमध्ये वाद झाला.

Haris Rauf
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग? 'या' संघाच्या खेळाडूंना आले अनेक नंबरवरून कॉल

वाद इतक्या टोकोला गेला की हारिस त्या फॅनच्या अंगावरच धावून गेला. त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. हारिसच्या पायातील चप्पल निसटलं तरी तो त्या चाहत्याला मारण्यासाठी धावला होता. काही चाहत्यांनी रौऊफला रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी हारिसने हा भारतीय आहेस का असं विचारलं त्यावेळी त्या चाहत्यानं नाही पाकिस्तानचा आहे असं म्हणत हारिसला तोंडघशी पाडलं.

पाकिस्तानचे सहा खेळाडू हे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही युएसएमध्येच राहत आहेत. त्यात हारिस रौऊफचा देखील समावेश आहे.

Haris Rauf
24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला लागला ब्रेक! टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

पाकिस्तानचा स्वप्नभंग

पाकिस्तानची यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुरूवातच खराब झाली होती. त्यांना यजमान युएसएकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतानं पाकिस्तानचा पराभव करत पाकिस्तानचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपवलं होतं.

पाकिस्तानला टी 20 वर्ल्डकपमधील पहिला विजय हा कॅनडाविरूद्ध मिळाला. मात्र त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा आयर्लंडविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. याचबरोबर पाकिस्तानचा टी 20 वर्ल्डकप 2024 मधील प्रवास देखील थांबला.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.