AUS vs PAK, T20 World Cup: स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाच्या जोरावर १७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरूवात डगमगत झाली. १२व्या षटकापर्यंत पाकिस्तानचा संघ सामन्यात वरचढ होता. त्यानंतर सामन्यात रंगत आली. अखेर मार्कस स्टॉयनीस आणि मॅथ्यू वेड या जोडीने संघाला दमदार विजय मिळवून दिला. या सामन्यात एक झेल सुटला आणि सामना फिरला.
सामन्याच्या १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूत केवळ २ धावा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू मॅथ्यू वेडने हवेत उडवला. त्यावेळी हसन अलीने तो झेल सोडला आणि त्या चेंडूवर आणखी दोन धावा मिळाल्या. या चेंडूनंतर ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत १८ धावांची आवश्यकता होती. शाहीन आफ्रिदीच्या वेगवान माऱ्यापुढे हे लक्ष्य साध्य करणं खूप कठीण होतं. पण वेडने पुढील तीन चेंडूंवर तीन षटकार खेचत पूर्ण षटक राखून सामना खिशात घातला आणि संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले.
हसन अलीने झेल सोडल्यानंतर वेडने संयमी खेळ करत संघाला विजय मिळवून दिलाच. पण महत्त्वाची बाब म्हणजे त्याने शाहिन आफ्रिदीच्या वेगाचा योग्य वापर केला. त्याने केवळ वेगवान चेंडूला दिशा देत किपरच्या डोक्यावर षटकार लगावला आणि संघाला अंतिम फेरीत नेले.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघाने दमदार खेळ करत सेमीफायनल फेरी गाठली होती. ते साखळी फेरी अजिंक्य होते. पाचपैकी पाच सामने जिंकून ते या फेरीत पोहोचले होते, पण एका पराभवामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.