Video : वर्ल्ड कप स्पर्धेतील दर्जेदार फिल्डिंगचा नजराणा एका क्लिकवर

17 आक्टोबरपासूनच टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
T20 World Cup
T20 World Cup Sakal
Updated on

T20 World Cup 2021 Best Fielding Moments : टी-20 वर्ल्ड स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एका बाजूला सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघाची दोन वेगवेगळ्या गटात कसरत सुरुये. दुसरीकडे आयसीसी रँकिंगच्या जोरावर थेट सुपर 12 मध्ये पात्र ठरलेले 8 संघ आपल्या भिन्न गटातील संघाविरुद्ध सराव सामना खेळताना दिसत आहेत. 17 आक्टोबरपासूनच टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

पहिल्या फेरीत अ आणि ब गटात प्रत्येकी चार-चार संघ सुपर 12 मध्ये पात्र होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड आणि नामीबीया या संघाचा समावेश असून ब गटात स्कॉटलंड, ओमान, बांगलादेश आणि पपुआ न्यू गिनी यांच्यात सुपर 12 ची शर्यत सुरु आहे. दोन गटातील या आठ संघातून चार संघ दुसऱ्या फेरीत सुपर 12 साठी पात्र ठरणार आहेत.

T20 World Cup
Video: कर्णधार रोहितने विराटला दिली बॉलिंग, अन्...

क्वॉलिफिकेशनसाठी सर्वच संघाचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. यादरम्यान अनेक खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सर्वोच्च नमुना दाखवून देत आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या वेबसाइटवर क्वॉलिफिकेशन सामन्यातील जबरदस्त क्षेत्ररक्षणाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. यात वेगवेगळ्या संघातील खेळाडूंनी टिपलेले अप्रतिम झेल. थेट स्टंप टिपत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूना तंबूत धाडण्याचे खास क्षण दिसून येतात.

T20 World Cup
किंग कोहलीने राहुलकरवी काढला आपल्या सहकाऱ्याचा काटा

पहिल्या फेरीतील अ गटात प्रत्येकी एक-एक सामन्यानंतर श्रीलंका, आयर्लंड प्रत्येकी एका विजयासह दोन गुण मिळवून पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहेत. या गटातील नेदरलंड आणि नामीबीया हे संघ स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. श्रीलंका आणि आयर्लंड सुपर 12 चे प्रबळ दावेदार असल्याचे दिसते. ब गटात स्कॉटलंड, ओमान आणि बांगालदेश यांच्यात चुरस आहे. स्कॉटलंडने जवळपास पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ओमान आणि बांगलादेश यातील कोणता संघ सुपर 12 मध्ये खेळताना दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()