T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी न्युयॉर्कमध्ये यादरम्यान भारतीय संघासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचे दिसून येत आहे.
Virat Kohli | Team India
Virat Kohli | Team IndiaSakal
Updated on

Team India Security: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी न्युयॉर्कमध्ये आहे. भारताला 5 जून रोजी या स्पर्धेतील पहिला सामना खेळायचा आहे. यादरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि भारतीय संघासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचे दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि रिंकू सिंग मैदानात येत असताना त्यांच्या आजूबाजूला अनेक सुरक्षारक्षक आहेत. सुरक्षारक्षकांकडे शस्त्रदेखील आहेत.

Virat Kohli | Team India
Venkatesh Iyer: शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत चर्चा आहे. भारत आणि पाकिस्तान संघात न्युयॉर्कमध्येच रविवारी सामना होणार आहे. अशात अशीही चर्चा आहे की ISIS ने या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. त्याचमुळे सध्या खेळाडूंच्या सुरक्षेही अधिक काळजी घेतली जात आहे.

न्युयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी देखील त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की त्यांनी न्युयॉर्क पोलिसांना कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सार्वजनिक सुरक्षेला प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर हा वर्ल्ड कप सुरक्षित आणि आनंदात आयोजित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे.

Virat Kohli | Team India
India vs Pakistan Ticket : कहरच झाला! भारत - पाकिस्तान सामन्याच्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत पोहचली लाखाच्या घरात

दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघात 1 जून रोजी झालेल्या सराव सामन्यात एका चाहत्याने रोहित शर्माला मैदानात येऊन भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला मैदानात लगेचच पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.

भारताला टी20 वर्ल्ड कपमधील पहिले तीन सामने न्युयॉर्कमध्ये खेळायचे आहेत. पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे, तर 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध, तर तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध 12 जूनला खेळायचा आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरद्ध भारताला फ्लोरिडा येथे खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.