Mitchell Marsh : गिरे तो भी टांग उपर... अफगाणिस्तानविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने टीम इंडियाला डिवचलं

Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistan : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाची नोंद केली.
Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistan
Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistansakal

Australia Captain Mitchell Marsh vs Afghanistan : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे उपांत्य फेरीची लढत आणखीनच रोमांचक झाली आहे.

भारतीय संघाने 2 विजयांसह अंतिम चारमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमधील कोणताही एक संघ गट अ मध्ये स्थान मिळवू शकतो. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने आपल्या उपांत्य फेरीच्या आशांबाबत विधान करत टीम इंडियाला डिवचले आहे.

Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistan
'ग्रुप A'मध्ये समीकरण झाले रंजक! ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून होणार बाहेर... कोणता संघ सेमी-फायनलमध्ये मारणार एट्री?

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मिचेल मार्शच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पराभवानंतर तो म्हणाला की, 'अफगाणिस्तान संघ आज चांगला क्रिकेट खेळला. आम्ही त्यांना 120 पर्यंत मर्यादित करू शकलो असतो. पण त्याने कदाचित 20 धावा जास्त केल्या. या स्पर्धेत अनेक संघांनी प्रथम गोलंदाजी केली आहे. नाणेफेक जिंकणे किंवा हरणे याने फरक पडत नाही. पण आम्ही मैदानावर चांगली कामगिरी केली नाही हे मान्य करतो. आज आमचा दिवस नव्हता.

Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistan
Video : भारत-बांगलादेश मॅचमध्ये हे काय घडलं? विराट कोहली घुसला स्टेजखाली, व्हिडिओ होतोय व्हायरल

मिचेल मार्शला सेमीफायनल आणि भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल विचारण्यात आले, ज्यावर तो म्हणाला, 'पहिली गोष्ट म्हणजे आता आम्हाला माहित आहे की आम्हाला पुढचा सामना जिंकायचा आहे. आम्हाला टीम इंडियासारखा चांगला संघ सापडणार नाही, जिच्याविरुद्ध आम्हाला जिंकायचे आहे. शेवटी, या विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तानला जाते आणि आम्ही या पराभवातून लवकर बाहेर पडू....

Australia Captain Mitchell Marsh Speaks after lost vs Afghanistan
Afg vs Aus : जोर का झटका धीरे से... टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या ठेचल्या नांग्या

अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 148 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ अवघ्या 127 धावांवर गडगडला आणि सामना 21 धावांनी गमावला. या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सोमवार, 24 जून रोजी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com