Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध भारताच्या Playing-11मधून स्टार ऑलराउंडरचा पत्ता कट; 'या' पठ्ठ्याला मिळणार संधी?

Indian Team Predicted Playing XI : भारतीय संघाला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे.
T20 World Cup 2024 Team India Playing XI (2)
T20 World Cup 2024 Team India Playing XI sakal

India vs England T20 World Cup 2024 2nd Semi-Final Playing-11 : भारतीय संघाला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांमधला या सामन्याचा थरार 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता रंगणार आहे. भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला असून एकही सामना गमावलेला नाही. सेमीफायनल मॅचमध्येही टीम इंडियाला हा ट्रेंड कायम ठेवायचा आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

T20 World Cup 2024 Team India Playing XI (2)
T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्याच्या 1 दिवसआधी कर्णधार टेन्शनमध्ये! स्टार फलंदाज झाला जखमी

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधील बदलांबद्दल बोलायचे झाले तर त्यात बदल होऊ शकतो. शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला मधल्या फळीत संधी मिळू शकते. आतापर्यंत संजू सॅमसनला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. तो एकाही सामन्यात खेळला नाही पण इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.

T20 World Cup 2024 Team India Playing XI (2)
T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्याच्या 1 दिवसआधी कर्णधार टेन्शनमध्ये! स्टार फलंदाज झाला जखमी

संजू सॅमसनला खेळवण्यामागचे कारण म्हणजे युवा अष्टपैलू शिवम दुबेची कामगिरी आतापर्यंत अत्यंत खराब राहिली आहे. आतापर्यंत त्याने एकूण 106 धावा केल्या आहेत. त्याने काही सामन्यांमध्ये छोट्या आक्रमक खेळी नक्कीच खेळल्या आहेत. पण त्याला फारशी छाप पाडता आलेली नाही. त्याला एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून संघात ठेवण्यात आले आहे पण आजपर्यंत तो ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकला नाही.

T20 World Cup 2024 Team India Playing XI (2)
Brian Lara on Afghanistan : ब्रायन लाराचा विश्‍वास ठरवला सार्थ! अफगाणचा कर्णधार राशीद खानचे उद्‌गार

याशिवाय शिवम दुबेला अद्याप गोलंदाजी देण्यात आलेली नाही. त्याला अष्टपैलू म्हणून संघात आणले होते पण त्याने गोलंदाजी केलेली नाही. अशा परिस्थितीत त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळवणे हा योग्य निर्णय म्हणता येणार नाही. जर त्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली असती तर त्याला स्थान मिळाले असते. परंतु तो फलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला वगळून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. सॅमसनकडे मोठे फटके मारण्याची क्षमताही आहे आणि तो टीम इंडियासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com