IND vs NZ सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मिळाली Good News!

भारत आणि न्यूझीलंड दोघांसाठीही आजचा सामना महत्त्वाचा | T20 World Cup 2021
IND-vs-NZ-Virat-Kohli
IND-vs-NZ-Virat-Kohli
Updated on
Summary

भारत आणि न्यूझीलंड दोघांसाठीही आजचा सामना महत्त्वाचा | T20 World Cup 2021

India vs New Zealand, T20 World Cup 2021: भारताचा टी२० विश्वचषकातील आज दुसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून अपमानकारक पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडचादेखील हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. त्यांनाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासांठी अतिशय महत्त्वाचा आहे. कागदावर पाहता, कोणत्या संघाचं पारडं जड राहणार याचा अंदाज बांधणं कठीण आहे. मात्र या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला एक गुड न्यूज मिळाली.

IND-vs-NZ-Virat-Kohli
T20 WC: ट्रेंट बोल्टची 'वॉर्निंग'; विराटने दिलं आक्रमक उत्तर

न्यूझीलंडचा पाकिस्तानशी एकमेव सामना झाला. त्यात न्यूझीलंडने १३४ धावांची मजल मारली होती. हे आव्हान पाकिस्तानने योग्य पद्धतीने पूर्ण केले. त्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टिल हा दुखापतग्रस्त झाला होता. हारिस रौफच्या गोलंदाजीवर सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पण तो भारताविरूद्धच्या सामन्यासाठी तंदुरूस्त आहे असं सांगण्यात आलं.

 Martin Guptill
Martin Guptill sakal media
IND-vs-NZ-Virat-Kohli
T20 WC : भारत की न्यूझीलंड.. टी२० वर्ल्ड कप मध्ये कोण भारी?

मार्टीन गप्टिल हा तंदुरूस्त असून तो आजचा सामना खेळू शकतो या वृत्ताला न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दुजोरा दिला. गप्टीलच्या पायाला जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी त्याच्या पायाची बोटं काळी-निळी पडली होती. पण त्यानंतर त्याचा त्रास कमी झाला. शुक्रवारी तो सराव सत्रात हजर होता. शनिवारी रात्रीच्या सराव सत्रातही त्याने फलंदाजी केली. त्यामुळे तो नक्कीच रविवारी भारताविरूद्धचा सामना खेळेल", असं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()