श्रीमंत लीगमुळे T 20 World cup गेला; चाहत्यांनी काढला IPL वर राग

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर पर #BANIPL ट्रेंड होताना दिसते.
IND vs NZ
IND vs NZT20 World Cup Twitter
Updated on

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान भारताचे आव्हान खडतर झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर विराट ब्रिगेडचा न्यूझीलंडने धुव्वा उडवला. परिणामी टीम इंडियावर आता साखळी फेरीतच गारद होण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाच्या ढिसाळ कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर पर #BANIPL ट्रेंड होताना दिसते.

#BANIPL या ट्रेंडच्या माध्यमातून लोक आयपीएलवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. आयपीएलमुळेच संघाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा ढासळली आहे, असा युक्तीवाद सोशल मीडियावर जोर धरत आहे. सामन्यानंतर सकाळच्या लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातूनही आम्ही भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारत क्रिकेट चाहत्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळीही बहुतांश चाहत्यांनी आयपीएल स्पर्धेमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. पैशासाठी आयपीएलमध्ये फ्रँचायझी टीमकडून धमाकेदार कामगिरी करणारे खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व करताना कमी पडतात. आयपीएलमधील अति क्रिकेटच्या थकव्यामुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे, अशा भावना अनेक क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

IND vs NZ
IND vs NZ: 'कुछ तो शरम करो..'; विराटवर संतापले भारतीय फॅन्स

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा नुकतीच युएईमध्ये पार पडली होती. या स्पर्धेनंतर लगेच टीम इंडियातील खेळाडू टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाले होते. आयपीएल स्पर्धा ही टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रंगीत तालीम ठरेल. या स्पर्धेचा टीम इंडियाला फायदा होईल, अशी चर्चा टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी रंगली होती. भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत UAE च्या मैदानात बोलबाला दाखवून देण्याचे संकेतही दिले होते.

IND vs NZ
T20 WC : जर असं घडलं तर टीम इंडिया सेमी फायनल खेळू शकते

पण मुख्य लढतीला सुरुवात झाल्यानंतर चित्र अचानक पालटले. वर्ल्ड कपच्या इतिहासात ज्या संघाविरुद्ध कधीच पराभवाचा सामना केला नव्हता त्या पाकिस्तानने टीम इंडियाला एकतर्फी पराभूत केले. त्यानंतर न्यूझीलंडनेही भारताला मोठ्या फरकाने नमवले. या दोन पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. याचा सर्व राग आता आयपीएलवर निघत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.