IND vs PAK: विसरभोळा रोहित! पाकविरुद्ध नाणेफेकीवेळी गोंधळला, बाबरही पाहात राहिला; Video व्हायरल

Rohit Sharma: नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींचा उत्साह पाहिल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कॉईन कुठं ठेवला हेच विसरला होता, पाहा Video
Rohit Sharma | Babar Azam
Rohit Sharma | Babar AzamSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs Pakistan, Toss: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान संघात सामना होत आहे. न्युयॉर्कमधील नवं स्टेडियमवर हा सामना होत आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच एक गमतीशीर घटना घडली.

नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याआधी नाणेफेकीवेळी प्रेझेंटेटर रवी शास्त्री यांनी अगदी उर्जेनं सुरुवात केली. त्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची ओळख करून दिली.

तसेच सामनाधिकारी डेव्हिड बून यांचीही ओळख करून दिली. त्यांचा उत्साह पाहून रोहित आणि बाबरही एकमेकांकडे पाहून हसले.

Rohit Sharma | Babar Azam
Ind vs Pak मॅचच्या पिचबाबत मोठी अपडेट! वापरलेल्या 'या' खेळपट्टीवर होणार सामना; 100 पेक्षा कमी असेल स्कोअर?

यानंतर नाणेफेक करण्यावेळी रोहितने सामनाधिकाऱ्यांकडे नाण्याची मागणी केली, त्यावेळी सामनाधिकारी आणि बाबरने त्याच्याकडेच नाणे असल्याचं सांगितल्यानंतर त्यालाच लक्षात आलं की त्यानेच नाणं त्याच्या खिशात ठेवलं आहे. त्यानंतर त्याने ते नाणं खिशातून काढलं, त्यावेळी बाबरच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं. यानंतर नाणेफेक झाली. ही नाणेफेक बाबर आझमने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, रोहितचा विसरभोळा स्वभाव अनेकांना माहित आहे. त्याने एखादी गोष्ट विसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो अनेकादा बऱ्याच गोष्टी विसरताना दिसला आहे. त्यामुळे तो नाणे खिशात विसरल्याबद्दल सोशल मीडियावरही युजर्स मजा घेताना दिसले.

दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध खेळलेले ११ खेळाडूच या सामन्यातही भारतीय संघाकडून खेळताना दिसतील. मात्र, पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांनी आझम खानच्या जागेवर इमाद वसीमला संधी दिली आहे.

Rohit Sharma | Babar Azam
T20 World Cup: विराट, रोहित अन् बाबरमध्ये कडवी टक्कर, IND vs PAK सामन्यादरम्यान तिघांमध्ये अव्वल क्रमांकासाठी रस्सीखेच

भारतीय संघाने यापूर्वी आयर्लंडविरुद्ध सामना जिंकला आहे, त्यामुळे या सामन्यात विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसेच पाकिस्तानने त्यांच्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्विकारला होता. त्यामुळे या सामन्यातून विजयी मार्गावर परतण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

  • पाकिस्तान - मुहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रीदी, हरीस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.