T20 World Cup Final: प्रत्येकवेळी फायनल गाठणं वाटतं तितकं सोप्पं नाही..., पण रोहितच्या टीम इंडियानं कसं करून दाखवलं?

Team India: टीम इंडियाने गेल्या काही वर्षात घेतलेल्या मेहनतीनं आणि सातत्यपूर्ण कामगिरीने अनेकदा फायनल गाठली आहे. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कपची फायनल खेळायची आहे. पण फायनलमध्ये पोहचण्याचा हा प्रवास जितका वाटतो तितका सोपा नक्कीच नाही.
Rohit Sharma | T20 World Cup 2024 Final
Rohit Sharma | T20 World Cup 2024 FinalSakal
Updated on

India in World Cup Final: टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या स्पर्धेत एक गोष्ट तर निश्चित समजली की, स्पर्धा कितीही मोठी असली तरी फॉरमॅटचा काही फरक टीम इंडियावर पडलेला नाही. टीम इंडिया फायनलमध्ये प्रबळ दावेदार होतेच, पण हेच सातत्य ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या मोठ्या संघात दिसून आलं नाही. यावरुनच लक्षात येतं की, भारतीय संघ सध्या दमदार खेळ खेळतोय.

२९ जून रोजी होणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात भारतापुढे दक्षिण अफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीवर कब्जा करण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. ब्रिजटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी-२० वर्ल्डकप च्या फायनल मध्ये पोहचली आहे, या संघाने सातवेळा आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, परंतु फायनलमध्ये स्थान मिळवण्यात ते अयशस्वी राहिले.

दुसरीकडे भारतीय संघ १९८३ चा वर्ल्डकप जिंकला, तसेच २००७ चा टी-२० वर्ल्डकप आणि २०११ चा एकदिवसीय वर्ल्डकप देखील भारतीय संघाच्या ताब्यात आहे. परंतु, दक्षिण आफ्रिका भारतीय संघापेक्षा अधिक अनुभवी आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. भारतीय संघापूर्वी दक्षिण आफ्रिकेला कसोटी दर्जा मिळाला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Rohit Sharma | T20 World Cup 2024 Final
IND vs SA T20 WC Final : बार्बाडोसमधून मोठी अपडेट! भारत-दक्षिण आफ्रिका फायनलची तारीख बदलणार? हे कारण आलं समोर

आज पहायचं म्हटलं तर, सध्या टीम इंडिया सतत ते काम करत आहे जे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा इतर कोणतीही मोठी टीम करू शकली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही फयनलमध्ये खेळणारा भारतीय संघ हा एकमेव आहे.

२०२४ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ एकही सामना न गमावता अंतीम फेरीत पोहोचला. एकुणच काय तर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून ते सर्वात मोठ्या टेस्ट फॉरमॅट मध्ये भारताचा दबदबा कायमच वेगळ्या प्रकारचा राहिला आहे.

अंतिम फेरी गाठणं सोप्पं काम नाही !

बऱ्याच क्रिकेटप्रेमीचं म्हणनं असतं की, जेव्हा दूसरा संघ फायनलचा सामना जिंकतो, तेव्हा अंतिम फेरीत पोहचण्याला काय महत्व? आकडेवारी त्याच्या मुद्द्याला समर्थन देते. 2019 ते 2021 या चक्रात भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर २०२१ ते २०२३ च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला.

२०२३ च्या वनडे वर्ल्डकप अंतिम सामन्यातही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण चित्राची दुसरी बाजूही पाहा. ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही फायनल खेळला का? ऑस्ट्रेलिया टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला का? तुम्ही इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या संघांबद्दल नेमका हाच प्रश्न विचारू शकता. या सगळ्याचे उत्तर 'नाही' असे आहे.

जगातील कोणताही संघ चांगली कामगिरी केल्याशिवाय पुन्हा पुन्हा फायनलमध्ये पोहोचू शकत नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. शेवटचे T20 वर्ल्डचे उदाहरण घ्या.

Rohit Sharma | T20 World Cup 2024 Final
IND vs SA : टी-20 मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका संघ किती वेळा भिडले? अंतिम सामन्यापूर्वी पहा हे आकडे

२०२२ साली सलामीच्या सामन्यात पराभूत होऊनही पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यानंतर २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये किंवा २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे काय झाले ते सर्वांनी पाहिले. क्रिकेट चाहत्यांनी हे देखील समजून घेतले पाहिजे की प्रत्येक सामना 'वैयक्तिक तेज' म्हणजेच कोणत्याही एका खेळाडूच्या क्षमतेच्या आधारे जिंकता येत नाही.

जर ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड कपमध्ये धावा केल्या परंतु टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने धावा केल्या नाहीत तर त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. याउलट भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून विराट कोहलीची बॅट अजूनही शांत आहे. पण बाकीचे खेळाडू त्यांच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे फारसा फरक पडला नाही. आपली भूमिका चोख बजावत आहे. त्यामुळे भारतीय संघ सातत्याने फायनल खेळत आहे.

कर्णधार म्हणून रोहितने काय काय केलं ?

काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्र असं होतं की, कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी आपला संघ उपांत्य फेरी गाठेल असे भारतीय चाहत्यांना वाटत होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा आत्मविश्वास आणखी वाढलेला पाहायला मिळला आहे. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला असून एकप्रकारे रोहित शर्माने भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विश्वास पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे.

आज भारतीय संघातील खेळाडूंना पराभवाची भीती वाटत नाही असे त्यांच्या कृतीमधून स्पष्ट होतयं कारण रोहितने सर्व खेळाङूंवर भरोसा ठेऊन मैदानात उतरवले आणि खेळाडू देखील त्यांचा चांगला परफॉर्मन्स देत आहे. पराभव त्यांना नक्कीच त्रास देतो पण पराभवाची भीती त्यांना सतावत नाही.

Rohit Sharma | T20 World Cup 2024 Final
T20 WC 24 Final Umpires : IND vs SA फायनल मॅचआधी ICCची घोषणा! पनौती अंपायरला मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

ऋषभ पंत याचे उत्तम उदाहरण आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या दोन महिन्यांपूर्वी संजू सॅमसन, इशान किशन, जितेश शर्मा, केएल राहुल अशी अनेक नावे यष्टिरक्षक म्हणून चर्चेत होती. पण ऋषभ पंत आयपीएलमध्ये परतताच रोहितने कर्णधार म्हणून पंतसोबतच जावे असे ठरवले.

रोहितच्या मनात असा विचार आला असेल की पंत प्रदीर्घ पुनर्वसनानंतर परतला आहे, फ्रँचायझी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फरक आहे, पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी प्रतिष्ठा निर्माण केली होती ती परत मिळवू शकेल का? पण असा कोणताही विचार रोहितच्या मनात आला नाही. तो पंतच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. त्याने पंतवर ज्याप्रकारे विश्वास व्यक्त केला, त्यावरून पंत एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे असे वाटत नव्हते.

उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला होता. सर्वांनी ती चित्रे पाहिली. विराट कोहली त्याच्या जवळ उभा राहून त्याला काहीतरी समजावून सांगत होता. साहजिकच तो त्यांना काही सकारात्मक सल्ला देत असेल. या दोघांनी जवळपास सर्व क्रिकेट एकत्र खेळले आहे.

शेवटच्या क्षणाला मात्र दोघांच्याही मनात एकच प्रश्न असेल – इतकी चमकदार कामगिरी करून फायनल गाठल्यानंतर ट्रॉफी कशी जिंकायची? हे आता शेवटी २९ जूनला समजेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.