IND vs ENG: ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला आता इंग्लंडची बारी? दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाला संधी

T20 World Cup 2024: इंग्लंडकडून दोन वर्षांपूर्वी झालेल्या मानहानीकारक पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताकडे यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात असणार आहे.
India vs England | T20 World Cup 2024
India vs England | T20 World Cup 2024Sakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी (27 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य सामना पार पडणार आहे. गयानामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना होणार आहे.

भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाबरोबर हिशोब चुकते केले आहेत. आता इंग्लंडशी दोन हात करण्यास भारतीय संघ तयार असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत आणि इंग्लंड हे दोन संघ सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. 2022 टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते. त्यावेळी इंग्लंडने भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताकडे यंदा असणार आहे.

India vs England | T20 World Cup 2024
T20 World Cup 2024: भारत-इंग्लंड संघात काट्याची टक्कर; आत्तापर्यंत कोण ठरलंय टी20 मध्ये वरचढ?

दोन वर्षांपूर्वी कसा झालेला सामना?

टी20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऍडलेडला भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली होती. मात्र केएल राहुल 5 धावांवरच बाद झालेला, तर रोहित शर्मा 27 धावांवर बाद झालेला. त्यावेळी दुसरी बाजू विराटने सांभाळली होती, परंतु त्याला साथ देणारा सूर्यकुमारही 14 धावांवर बाद होत माघारी परतला होता.

मात्र यानंतर विराटला हार्दिक पांड्याने चांगली साथ दिलेली. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. यादरम्यान विराटनेही त्याने अर्धशतक केले होते. मात्र 40 चेंडूत 50 धावांची खेळी केल्यानंतर विराटला ख्रिस जॉर्डनने बाद केले होते. पण तो बाद झाल्यानंतरही हार्दकने आक्रमक पवित्रा स्विकारात फटकेबाजी केलेली.

हार्दिक डावाच्या शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झालेला. हार्दिकने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 63 धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताने 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या होत्या.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ख्रिस जॉर्डनने 3 विकेट्स घेतलेल्या, तर ख्रिस वोक्स आणि आदिल राशीद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

India vs England | T20 World Cup 2024
IND vs ENG: 'भारताला हरवायचे असेल, तर...', सेमीफायनलपूर्वी इंग्लंडला टी20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा इशारा

त्यानंतर 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स उतरले होते. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना अवघ्या 16 षटकात विकेट न गमावता 170 धावा करत इंग्लंडला अंतिम सामन्यात पोहचवले होते. बटलर आणि हेल्स या दोघांनीही अर्धशतके केली होती.

बटलरने 49 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 80 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ऍलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केली होती. त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले होते.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि हार्दिक पांड्या यांनी गोलंदाजी केली होती. पण कोणालीही विकेट घेता आली नव्हती.

Chitra kode:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.