Ind vs Aus : कर्णधार रोहित टेन्शनमध्ये! सेमी-फायनलच्या शर्यतीतून टीम इंडिया जाणार बाहेर... जाणून घ्या समीकरण

India vs Australia T20 World Cup 2024 Group A Points Table : क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. अशा परिस्थितीत ही सर्व समीकरणे नाकारता येत नाहीत.
Team India Semi Final Scenarios
Team India Semi Final Scenariossakal
Updated on

Team India Semi Final Scenarios : ग्रुप-1 मध्ये उपांत्य फेरीची शर्यत अधिक रंजक बनली आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका आहे. पण जर टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन वाढू शकते.

भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?

भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास ते उपांत्य फेरीत सहज जातील. याशिवाय हा सामना पावसामुळे रद्द झाला तरीही भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.

Team India Semi Final Scenarios
IND vs AUS Super-8 : भारताकडून हारल्यानंतर पण ऑस्ट्रेलिया जाणार सेमी-फायनलमध्ये; जाणून घ्या ग्रुप A मधील समीकरणे?

भारतीय संघ खरोखरच उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याचा धोका आहे का?

खरं तर, ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले आणि अफगाणिस्तान संघाने बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर संपूर्ण प्रकरण नेट रन रेटवर असेल. सध्या भारतीय संघाचा रन रेट +2.425 आहे तर ऑस्ट्रेलियाचा +0.223 आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा -0.650 आहे. सध्या रनरेटच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल आहे, पण ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने काही मोठा चमत्कार केला तर टीम इंडिया रनरेटच्या बाबतीत या दोन संघांपेक्षा मागे पडू शकतो.

Team India Semi Final Scenarios
Ind vs Aus : टीम इंडिया घेणार वनडे वर्ल्ड कपचा बदला! कर्णधार रोहित आज ऑस्ट्रेलियन संघाचे करणार पॅकअप?

...असे झाल्यास टीम इंडिया शर्यतीतून होणार बाहेर

जर ऑस्ट्रेलियन संघाने भारताला किमान 42 धावांनी हरवले आणि अफगाणिस्तानने बांगलादेशवर 83 धावांनी विजय मिळवला, तर नेट रन रेटमुळे भारतीय संघ स्पर्धेबाहेर होईल आणि ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीत जाईल.

क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. अशा परिस्थितीत ही सर्व समीकरणे नाकारता येत नाहीत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 24 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.