India Squad Zimbabwe : BCCIचा मोठा निर्णय! टी-20 वर्ल्ड कप 2024नंतर रोहित शर्माची सुट्टी; 'प्रिन्स' होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार?

Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Tour : भारतीय क्रिकेट संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळत आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया लगेच झिम्बाब्वेचा दौरा जाणार आहे.
Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Tour
Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Toursakal

India Squad for Zimbabwe T20 Series : भारतीय क्रिकेट संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळत आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया लगेच झिम्बाब्वेचा दौरा जाणार आहे.

मात्र, या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडू जाणार नसून केवळ युवा खेळाडूंनाच संधी दिली जाईल. याच कारणामुळे शुभमन गिलला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, असे वृत्त आहे.

Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Tour
India Team Semi-Final : दक्षिण आफ्रिका की इंग्लंड, सेमी-फायनलमध्ये टीम इंडिया कोणाशी भिडणार? समजून घ्या गणित

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली नाही. गिलला राखीव खेळाडूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. मात्र, टीम इंडियाचा न्यू यॉर्क लेग संपताच शुभमन गिलला भारतात परत पाठवण्यात आले. यानंतर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, नंतर गिलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून वादाचे वृत्त फेटाळून लावले.

Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Tour
Ind vs Aus : कर्णधार रोहित टेन्शनमध्ये! सेमी-फायनलच्या शर्यतीतून टीम इंडिया जाणार बाहेर... जाणून घ्या समीकरण

आता इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टी-20 वर्ल्ड कपनंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात येणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दौऱ्यावर जाण्याची फारशी आशा नाही आणि अशा परिस्थितीत गिलकडे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

Shubman Gill likely to be named captain Zimbabwe Tour
IND vs AUS Super-8 : भारताकडून हारल्यानंतर पण ऑस्ट्रेलिया जाणार सेमी-फायनलमध्ये; जाणून घ्या ग्रुप A मधील समीकरणे?

व्हीव्हीएस लक्ष्मण यांना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आशियाई क्रीडा स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मणने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते आणि संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर या दौऱ्यावर कोचिंगसाठी उपलब्ध असणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com