जे पाकिस्तान संघानं करुन दाखवलं तेच टीम इंडियाला करावे लागेल!

स्पर्धा युएईच्या मैदानात होत असली तरी या स्पर्धेचे यजमान पद हे भारताकडेच आहे.
India v New Zealand
India v New Zealand Sakal
Updated on

India v NZ in ICC events Record since 2003 : युएईच्या मैदानात सुरु असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दणका देत धमाकेदार विजयाची नोंद केली. सुपर 12 मधील ग्रुप 2 मध्ये पाकिस्ताने पहिला सामना जिंकला आहे. या गटातील अव्वल दोन संघ सेमी फायनलमध्ये धडक मारतील.

स्पर्धा युएईच्या मैदानात होत असली तरी या स्पर्धेचे यजमान पद हे भारताकडेच आहे. पहिल्या पराभवातून सावरत यजमानांना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसते. आता तुम्ही म्हणाल केवळ एक सामना झाल्यावर भारतीय संघ गोत्यात कसा येऊ शकतो? त्याच उत्तर न्यूझीलंड विरुद्धची भारताची कामगिरी हे आहे. आयसीसीच्या स्पर्धेत 2003 पासून न्यूझीलंडच्या संघासमोर भारतीय संघाला विजय मिळवता आलेला नाही. 2007 च्या T20 World Cup वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले होते. 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने हा रेकॉर्ड आणखी भक्कम केला. यावेळीही भारतीय संघाच्या पदरी निराशा आली.

India v New Zealand
दोन वेळच्या चॅम्पियनचा सलग दुसरा पराभव; आफ्रिकेनं मारली बाजी

इंग्लंड मध्ये झालेल्या 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक सामना अनिर्णित राहिला होता. तर याच स्पर्धेत सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत फायनल गाठली होती. 2020 मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल रंगली. यातही केन विल्यमसनच्या संघाने बाजी मारली. त्यामुळेच भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

India v New Zealand
Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या

जर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे खराब रेकॉर्ड कायम राहिले तर स्पर्धेतील पुढची गणिते बिघडू शकतात. त्यामुळेच रविवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्धचे आयसीसी स्पर्धेतील रेकॉर्ड बदलण्याच्या इराद्याने टीम इंडियाला मैदानात उतरावे लागेल. दुसऱ्या सामन्यातील विजयासह आपली स्पर्धेतील दावेदारी भक्कम करण्यासाठी जे पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध करुन दाखवले तेच आता टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात करुन दाखवावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.