IND vs AFG T20 WC 2024 : बुमराह पाठोपाठ अर्शदीपचेही धक्के; भारताने साजरा केला सुपर 8 मधला पहिला विजय

T20 World Cup 2024 : भारत आणि अफगाणिस्तान हे आज टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 फेरीत एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघाचा हा सुपर 8 मधील पहिलाच सामना आहे.
jasprit bumrah
IND vs AFG T20 WC 2024 ESAKAL

India Vs Afghanistan T20 World Cup 2024 : भारताने टी 20 वर्ल्डकप सुपर 8 मधील आपला पहिला सामना जिंकला.

टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांचे आव्हान ठेवले होते. अफगाणिस्ताला 134 धावात रोखले. भारताकडून जसप्रीत बुमराहने फक्त 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याला अर्शदीपने 3 आणि कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानने अझमतुल्ला ओमरजाईने सर्वाधिक 26 धावा केल्या.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी संथ आणि फिरकीला साथ देण्यारी असल्यानं भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंतने आणि विराट कोहलीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत 6 षटकात जवळपास अर्धशतकी मजल मारून दिली.

मात्र राशिद खानने भारताला मोठमोठे धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने पंतला 20 धावांवर त्यानंतर विराटला 24 धावांवर बाद केलं. राशिद इथंच थांबला नाही तर त्यानं शिवम दुबेलाही 10 धावांवर बाद केलं.

यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डाव सावरत भारताला शतकी मजल मारून दिली. भारताने जरी विकेट्स गमावल्या तरी धावगती मंद होऊ दिली नाही. भारताने 15 षटकात 126 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यानं 27 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला देखील 150 च्या पार पोहचवलं. पांड्यानेही 32 धावा केल्या.

स्लॉग ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने चांगला मारा करत भारताला धक्के दिले. मात्र शेवटच्या षटकात अक्षर पटेलने दोन चौकार मारत 14 धावा वसूल केल्या. भारताने 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या.

IND vs AFG T20 WC 2024 Live : बुमराह पाठोपाठ अर्शदीपचेही धक्के; भारताच्या विजयाची औपचारिकता बाकी

जसप्रीत बुमराहनंतर अर्शदीप सिंगने सलग दोन विकेट घेत अफगाणिस्तानची अवस्था 9 बाद 121 धावा अशी केली.

IND vs AFG T20 WC 2024 Live : भारताने अफगाणिस्तानचा निम्मा संघ केला गारद; भारताची विजयाकडे कूच

जसप्रीत बुमराहनंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी अफगाणिस्तानला धक्के देण्यास सुरूवात केली. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट्स घेतली. अफगाणिस्तानच्या 14 षटकात 5 बाद 91 धावा केल्या.

IND vs AFG T20 WC 2024 Live : अफगाणिस्तानची गाडी घसरली; भारताची सामन्यावर पकड

भारताने ठेवलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची फलंदाजी ढेपाळली. भारताने पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानला 3 धक्के दिले. जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलने एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. अफगाणिस्तानच्या 7 षटकात 3 बाद 40 धावा झाल्या होत्या.

भारताने केल्या 181 धावा 

भारताने 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 53 तर हार्दिक पांड्याने 32 धावा केल्या. ऋषभ पंतने 11 चेंडूत 20 धावा ठोकत भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर अक्षर पटेलने 6 चेंडूत 12 धावा करत स्लॉग ओव्हरमध्ये भारताला चांगल्या धावा करून दिल्या.

हार्दिक पांड्या बाद 

सूर्यासोबत हार्दिक पांड्याने देखील आक्रमक फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 32 धावा केल्या. मात्र नवीन उल हकने बाद करत भारताला सहावा धक्का दिला. भारताच्या 18.1 षटकात 6 बाद 161 धावा केल्या आहेत.

IND vs AFG T20 WC 2024 Live : सूर्याचं अर्धशतक! टीम इंडियाला सावरलं; भारताची गाडी रूळावर

सूर्यकुमार यादवने 27 चेंडूत अर्धशतक ठोकत भारताला देखील 150 च्या पार पोहचवलं. मात्र त्यानंतर तो लगेचच बाद झाला. भारताच्या 17.1 षटकात 5 बाद 151 धावा केल्या आहेत.

IND vs AFG T20 WC 2024 Live : सूर्यानं टीम इंडियाला सावरलं; भारताची गाडी रूळावर

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सूर्याने जवळपास 180 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. भारताने 16 षटकात 4 बाद 168 धावा केल्या.

IND vs AFG T20 WC 2024 Live : राशिदनं टीम इंडियाला दिले धक्यावर धक्के; शिवम दुबेला देखील केलं बाद

राशिद खानने भारताचा एका पाठोपाठ एक अशा तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं शिवम दुबेला 10 धावांवर बाद केलं. भारताची अवस्था 11 षटकात 4 बाद 90 धावा अशी झाली होती.

IND vs AFG T20 WC 2024 Live : अफगाणिस्तानने भारताची हवा केली टाईट; राशिदने विराटचीही केली शिकार

राशिद खानने भारताची हवा टाईट केली. 24 चेंडूत 24 धावा करत एक बाजू लावून धरलेल्या विराट कोहलीला बाद करत त्याने भारताला तिसऱा आणि मोठा धक्का दिला. भारताने 9 षटकात 3 बाद 67 धावा केल्या आहेत.

IND vs AFG T20 WC 2024 Live : राशिद खानने दिला मोठा धक्का; आक्रमक पंत पॅव्हेलियनमध्ये

राशिद खानने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पंतला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पंतने 11 चेंडूत 20 धावा केल्या.

IND vs AFG T20 WC 2024 Live : रोहितची उणीव पंतने काढली भरून, पॉवर प्लेमध्ये भारताची दमदार सुरूवात

रोहित बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी स्विकारली. त्यानं 8 चेंडूत 19 धावा चोपत भारताला 6 षटकात 1 बाद 48 धावांपर्यंत पोहचवलं. नवीन उल हकने त्याला एक जीवनदान देखील दिलं.

IND vs AFG T20 WC 2024 Live : भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा 8 धावा करून माघारी

फजलहक फारूकीने रोहित शर्माला 8 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. भारताच्या 3 षटकात 1 बाद 16 धावा झाल्या आहेत. पंतने आल्या आल्या चौकार मारत आपलं खातं उघडलं

IND vs AFG T20 WC 2024 Live : नाणेफेक रोहितनं जिंकली, संघात केला एक महत्वाचा बदल

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये एक बदल केला आहे. मोहम्मद सिराजच्या जागी चायनामन बॉलर कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs AFG : हेड टू हेड

भारत आणि अफगाणिस्तान यांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यातील तीनही सामने भारताने जिंकले आहेत. याचबरोबर टी 20 मध्ये देखील भारताचे अफगाणिस्तानविरूद्धचे रेकॉर्ड क्लीन स्विपवालच आहे. आठ सामन्यापैकी सात सामन्यात भारताने विजय मिळवला तर एक सामना अनिर्णित राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com