IND vs AFG : भारताविरूद्ध अफगाणिस्तानचे किती विजय? सुपर 8 मध्ये आज दोन शेजारी भिडणार

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होत आहे.
T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 Super 8esakal

T20 World Cup 2024 Super 8 : बारबाडोसमध्ये आज टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान हे दोन शेजारी देश भिडणार आहेत. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात भारतात तीन सामन्यांची मालिका झाली होती. या मालिकेत भारताने अफगाणिस्तानला 3-0 असा क्लीन स्विप दिला होता.

याच मालिकेतील बंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या होत्या. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला खूप कष्ट करावे लागले होते. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामने झाले आहेत. त्यातील तीनही सामने भारताने जिंकले आहेत.

T20 World Cup 2024
T20 World Cup, IND vs AFG: चहल किंवा कुलदीपला संधी मिळणार संधी, प्लेइंग-11 मध्ये बदल होणार? द्रविडने स्पष्टच सांगितलं

भारत विरूद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड

एकूण सामने - 8

भारत - 7 सामन्यात विजयी

अफगाणिस्तान - एकही सामना जिंकला नाही.

अनिर्णित सामने - 1

भारत Vs अफगाणिस्तान सामन्यापूर्वी काही खास आकडे

1 - टी 20 वर्ल्डकप नॉक आऊटमध्ये भारताकडून फक्त एकाच शतक ठोकण्यात आले आहे. 2010 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुरेश रैनाने शतकी खेळी केली होती.

2 - अफगाणिस्तानविरूद्ध भारताकडून टी 20 मध्ये दोन शतके ठोकण्यात आली आहेत. विराट कोहलीने नाबाद 122 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने नाबाद 121 धावांची खेळी केली होती.

2022 मध्ये दुबईत खेळल्या गेलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीतला हा अफगाणिस्तानविरूद्धचा सर्वात मोठा विजय होता.

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरूद्ध टी 20 क्रिकेटमध्ये 171.79 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरूद्ध 100 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये हे सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup: भारताच्या पहिल्याच सुपर-8 सामन्यात येणार पावसाचा अडथळा? पाहा काय आहेत हवामान अंदाज

भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

अफगाणिस्तानची संभाव्य प्लेईंग 11

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, गुलबदीन नईब, अजमतुल्लाह ओमरजाई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जन्नत, राशिद खान (कप्तान), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com