IND vs AUS T20 WC 24 : उट्ट काढलं! कुलदीप, अर्शदीपनं उजळलं भारताचं भाग्य, भारतानं गाठली सेमी फायनल

T20 World Cup 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना हा अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासाठी विजय आवश्यकच आहे.
kuldeep Yadav
IND vs AUS T20 WC 24 LiveESAKAL
Updated on

India vs Australia T20 World Cup 2024 : भारताने वनडे वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेतला.

भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत आपला सुपर 8 मधील तिसरा सामना देखील जिंकला. भारत सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये टॉप करत सेमी फायनल गाठली आहे. आता 27 जूनला भारत इंग्लंडविरूद्ध सेमी फायनल खेळणार आहे. भारताच्या या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा आता सेमी फायनल गाठण्याच्या स्वप्नावर जवळपास पाणी फिरलं आहे. आता बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तान जिंकला तर ते थेट सेमी फायनलमध्ये पोहचतील.

भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी करत 24 धावात 2 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंगने 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बुमराहने 43 चेंडूत 76 धावा करणाऱ्या हेडला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. अक्षर पटेलनेही एक विकेट घेत चांगली साथ दिली.

टी 20 वर्ल्डकप 2024 मधील सुपर 8 च्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 20 षटकात 5 बाद 205 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 92 तर सूर्यकुमार यादवने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि स्टॉयनिसने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोहित शर्माच्या झंजावातापुढे कांगारूंच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली. रोहितने 41 चेंडूत 92 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळेच भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोठी धावसंख्या उभारली.

भारताकडून रोहितनंतर सूर्याने 31 धावांचे योगदान दिले. तर शिवम दुबेने (28 धावा) देखील चांगली फलंदाजी केली. भारताने 17 षटकात 171 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताची धावगती मंदावली. अखेर हार्दिकच्या 27 आणि रविंद्र जडेजाच्या एका षटकाराच्या जोरावर भारताने 205 धावांपर्यंत मजल मारली

ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज बाद 

ऑस्ट्रेलियाने 6 फलंदाज बाद करत भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे.

IND vs AUS T20 WC 24 Live : भारताचे पुनरागमन, कुलदीप पाठोपाठ अक्षरनेही दिले धक्के

पहिल्या 10 षटकात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी मुसक्या आवळल्या. या दोघांनी विकेट्स घेत धावाही रोखल्या. ऑस्ट्रेलियाची अवस्था 14.4 षटकात 4 बाद 136 धावा केल्या आहेत.

IND vs AUS T20 WC 24 Live : अक्षरने टिपला अप्रतिम झेल; कुलदीपनं मार्शचा अडसर केला दूर

ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडत कुलदीप यादवने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. मिचेल मार्शला बाद करत कुलदीपने 42 चेंडूत 81 धावांची भागीदारी रचणारी जोडी फोडली. ऑस्ट्रेलियाच्या 9.2 षटकात 91 धावा झाल्या आहेत.

ट्रॅविस हेड झाला सेट 

ट्रॅविस हेडने सेट झाल्यावर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 6 षटकात 65 धावांपर्यंत पोहचवलं.

IND vs AUS T20 WC 24 Live : मिचेल मार्शला दोन जीवनदान; अडखळत्या सुरूवातीनंतर कांगारूंची गाडी रूळावर

भारताने ठेवलेल्या 206 धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्शला पंत आणि त्यानंतर अर्शदीपने जीवनदान दिलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी ऑस्ट्रेलियाला 5 षटकात 41 धावांपर्यंत मजल मारून दिली.

शेवटच्या दोन षटकात धुमाकूळ

हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी करत भारताला 200 जवळ पोहचवले. शिवम दुबे 15 चेंडूत 28 धावा करत बाद झाला.

शेवटच्या षटकात रविंद्र जडेजाने एक षटकार मारत भारताला 200 च्या पार पोहचवलं. भारताने 20 षटकात 5 बाद 205 धावा केल्या.

IND vs AUS T20 WC 24 Live : स्टार्कचा भारताला अजून एक धक्का; मोक्याच्या क्षणी सूर्या बाद

रोहित आणि सूर्या बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. भारताने 18 षटकात 181 धावा झाल्या होत्या.

IND vs AUS T20 WC 24 Live : स्टार्कचा भारताला अजून एक धक्का; मोक्याच्या क्षणी सूर्या बाद

मिचेल स्टार्कने भारताला मोठा धक्का दिला. त्याने 16 चेंडूत 31 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला बाद केलं. भारताने 15.2 षटकात 4 बाद 162 धावा केल्या आहेत.

IND vs AUS T20 WC 24 Live : रोहित शतकाच्या उंबरठ्यावर; भारतानं ऑस्ट्रेलियाला दिले दणके

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाची एकहाती धुलाई करत भारताला 11 षटकात 127 धावांपर्यंत पोहचवलं. भारताने जवळपास 12 च्या रनरेटने धावा केल्या. मात्र 41 चेंडूत 92 धावा करणारा रोहित स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला.

IND vs AUS T20 WC 24 Live : भारताला दुसरा धक्का; पंत 15 धावा करून माघारी

भारताचा कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला 8 षटकात 90 धावांच्या पुढे नेले. मात्र 15 धावा करणारा पंत स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताने 9 षटकात 2 बाद 102 धावा केल्या होत्या.

IND vs AUS T20 WC 24 Live : रोहितचे 19 चेंडूत अर्धशतक; भारताने 5 षटकात पार केल्या 50 धावा

रोहित शर्माने 19 चेंडूत 50 धावा करत भारताला 5 षटकात 53 धावांपर्यंत पोहचवलं.

IND vs AUS T20 WC 24 Live : रोहित शर्माचा झंजावात; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केली धुलाई

रोहित शर्माने 14 चेंडूत 41 धावा चोपत भारताला 4.1 षटकात 1 बाद 43 धावापर्यंत पोहचवले.

IND vs AUS T20 WC 24 Live : स्टार्क नावाचं भूत रोहितनं उतरवलं; एकाच षटकात चोपल्या 29 धावा 

रोहित शर्माने मिचेल स्टार्कच्या एकाच षटकात 29 धावा चोपून भारताला दमदार सुरूवात करून दिली. भारताने 3.2 षटकात 1 बाद 35 धावा केल्या आहेत.

IND vs AUS T20 WC 24 Live : भारताला मोठा धक्का; विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी

जॉस हेजलवूडने विराट कोहलीला शुन्यावर बाद केलं.

मिचेल मार्शने जिंकली नाणेफेक 

भारताविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेड टू हेड : IND vs AUS

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातील 3 वेळा भारताने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यात विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.