T20 World Cup 2024 IND vs CAN : भारताने टी 20 वर्ल्डकपमध्ये आपला तिसरा सामना युएसएसोबत खेळला. हा सामना भारताने तीन विकेट्सनी जिंकला. याचबरोबर भारताने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने लीग स्टेजमधील आपले तीनही सामने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. तेथील खेळपट्टी गोलंदाजांना फारच पोषक होती. या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांची चांगलीच परीक्षा पाहिली.
भारतीय संघ आता आपला चौथा सामना हा फ्लोरिडा येथे खेळणार आहे. हा सामना कॅनडासोबत होणार असून भारतीय संघ आपली विजयी घोडदौर कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.
फ्लोरिडामधील ब्रोवार्ड काऊंडी स्टेडियमचे पिच हे न्यूयॉर्क इतकं गोलंदाजांना पोषक असणार नाही. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर चेंडू असमान उसळत होता. आऊट फिल्ड देखील खूप संथ होती. या खेळपट्टीवर भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांनाच जास्त महत्व दिलं होतं. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
आता कॅनडाविरूद्ध या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या या फिरकीला साथ देणाऱ्या आहेत. त्याची तयारी करण्यासाठी या दोघांपैकी एकाला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. या मैदानावर आतापर्यंत 16 सामने झाले आहेत. त्यात सरासरी धावसंख्या ही जवळपास 165 धावा इतकी आहे.
या खेळपट्टीवर संघ 180 पर्यंत धावसंख्या उभारू शकतो. न्यूयॉर्कमध्ये हीच सरासरी 110 ते 120 होती. फ्लोरिडामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 11 सामने जिंकले आहेत. तर चेस करताना फक्त 4 सामन्यात विजय मिळाला आहे. इथं चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो.
भारतासाठी हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगची चांगली कामगिरी हा मोठा दिलासा आहे. हे दोन्ही खेळाडू हे आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते. भारतीय संघ व्यवस्थापनाला मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाकडून अजून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत : रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
कॅनडा : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, रविंदरपाल सिंह, नवनीत धालीवाल, कलीम सना, दिलोन हेयलिंगर, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, परगट सिंह, निकोलस किर्टन, रायनखान पठाण, जुनैद सिद्दीकी, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मूववा, ऋषभ जोशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.