IND vs ENG T20 WC 24 : बापूने इंग्लंडला आणलं गुडघ्यावर, कुलदीपचाही जलवा; 10 वर्षांनी भारतानं गाठली फायनल

T20 World Cup 2024 Live : भारताने 2014 नंतर पहिल्यांदाच टी 20 वर्ल्डकपची गाठली फायनल
India Vs England
India Vs England T20 World Cup 2024 esakal
Updated on

India Vs England T20 World Cup 2024 Semi Final : भारताने इंग्लंडचा पराभव करत गाठली फायनल 

टी 20 वर्ल्डकप 2024 च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत तब्बल 10 वर्षांनी फायनल गाठली. यापूर्वी भारातने 2014 मध्ये टी 20 वर्ल्डकपची फायनल गाठली होती. त्यावेळी श्रीलंकेने भारताचा पराभव करत स्वप्न तोडले होते. आता भारतीय संघ 29 जूनला बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे.

भारताचे 171 धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला 103 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने 25 तर जोफ्रा आर्चरने 21 धावा केल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीला पाचारण केलं. मात्र पावसाच्या लपंडावात भारताची सुरूवात खराब झाली. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्माने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला सूर्यकुमार यादवची समर्थ साथ मिळली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली.

रोहित शर्माने 57 धावांची तुफानी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर सूर्याने 47 धावा केल्या. मात्र या दोघांच्या विकेटनंतर धावगती थोडी मंदावली. परंतु हार्दिक पांड्याने 18 व्या षटकात दोन षटकार मारत गेम चेंज गेला. हार्दिक 57 धावांची 13 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजाने 17 अन् अक्षर पटेलने 10 धावा करत भारताला 170 धावांच्या पार पोहचवले. इंग्लंडकडून जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : बापूने इंग्लंडला आणलं गुडघ्यावर; कुलदीपनेही दिले दोन धक्के

कुलदीप यादवने सॅम करन आणि हॅरी ब्रुकला बाद करत इंग्लंडची अवस्था 11 षटकात 6 बाद 68 धावा अशी केली.

IND vs ENG T20 WC 24 Live : बापूने इंग्लंडला आणलं गुडघ्यावर; टीम इंडियाची सामन्यावर पकड

अक्षर पटेलने मोईन अलीला स्टम्पिंग करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. इंग्लंडच्या 8 षटकात 4 बाद 49 धावा केल्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : पॉवर प्लेमध्ये इंग्लंडला तीन धक्के; अक्षरने उडवले तीन इंग्रज

अक्षर पटेलने जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलर यांनी बाद करत इंग्लंडला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के दिले. जसप्रीत बुमराहने सॉल्टचा त्रिफळा उडवला. इंग्लंडच्या 6 षटकात 3 बाद 39 धावा झाल्या होत्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : अक्षरने केली मोठी शिकार; आक्रमक बटलरला पाठवलं पॅव्हेलियनमध्ये

जॉस बटलरने 15 चेंडूत 23 धावा करत चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने त्याची ही आक्रमक खेळी संपुष्टात आणत इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंग्लंडच्या 4 षटकात 1 बाद 33 धावा झाल्या आहेत.

IND vs ENG T20 WC 24 Live : अक्षर-जडेजाची फटकेबाजी; भारताने इंग्लंडसमोर ठेवले 172 धावांचे आव्हान

स्लॉग ओव्हरमध्ये अक्षर पटेल आणि रविंद्र जेडजा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला 171 धावांपर्यंत पोहवचलं. जडेजाने नाबाद 23 तर अक्षरने 10 धावा केल्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : हार्दिकची छोटी मात्र स्फोटक खेळी; भारत 150 धावांच्या जवळ

सूर्यकुमार बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 23 धाांची खेळी मात्र त्याला जॉर्डनने बाद केले. पाठोपाठ शिवम दुबे देखील शुन्यावर बाद झाला. भारताच्या 18 षटकात 147 धावा झाल्या होत्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : स्लॉग ओव्हरमध्ये सूर्या झाला बाद, भारत अडचणीत

रोहित बाद झाल्यानंतर सूर्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र आर्चरने त्याला 47 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. भारताच्या 16 षटकात 4 बाद 126 धावा झाल्या आहेत.

IND vs ENG T20 WC 24 Live : रोहित शर्मा अर्धशतक करून झाला बाद; सूर्यावर मदार

पाऊस थांबल्यानंतर भारताने आपला डाव 65 धावांपासून पुढे नेला. रोहितने अर्धशतक ठोकत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहित अन् सूर्यानं दुसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 73 धावा केल्या. मात्र राशिदने रोहित शर्माला 57 धावांवर बाद केलं.

IND vs ENG T20 WC 24 Live : पुन्हा पावसाचा खेळ; रोहित रंगात आला असताना सामना थांबला

रोहित शर्मा चांगल्या रंगात आला असताना पावसाने पुन्हा खेळात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 8 षटकात 2 बाद 65 धावा झाल्या होत्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : भारताचं अर्धशतक; पंत नंतर रोहितने डावाची सूत्रे घेतली हातात

रोहित शर्माने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याने 35 धावा करत संघाला 7 षटकात 55 धावांपर्यतं पोहचवलं.

IND vs ENG T20 WC 24 Live : कर्णधार रोहितची पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी; मात्र भारताला दुसरा धक्का

सॅम करनने भारताला दुसरा धक्का दिला. त्याने ऋषभ पंतला 4 धावांवर बाद केलं. भारताच्या 5.3 षटकात 41 धावा झाल्या होत्या.

IND vs ENG T20 WC 24 Live : विराट कोहली पुन्हा फेल; 10 धावांच्या आत पॅव्हेलिनमध्ये

टोप्लेने भारताला पहिला धक्का दिला. त्याने विराट कोहलीला 9 धावांवर बाद केले. भारताच्या 4 षटकात 4 षटकात 29 धावा झाल्या आहेत.

भारत प्रथम फलंदाजी करताना...

- इंग्लंड टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये

- न्यूझीलंडविरूद्ध 2021 च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पराभूत

- दुसऱ्यांना बॅटिंग करताना तीन पैकी तीन विजय (2010 - श्रीलंका, 2016 - न्यूझीलंड, 2022 - भारत)

- 2021 पासून आयसीसी स्पर्धेतील भारताचे पाचही पराभव हे प्रथम फलंदाजी करताना झाले आहेत.

IND vs ENG T20 WC 24 Live : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असती करत मी प्रथम फलंदाजी करणार होतो असं सांगितलं. टीम इंडियाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

 IND vs ENG T20 WC 24 Live : नाणेफेकीची वेळ ठरली, इतक्या वाजता होणार सामना सुरू

पावसाने उसंत घेतली आहे. त्याचबरोबर पंचांनी देखील नाणेफेकीची वेळ ठरवली आहे. नाणेफेक स्थानिक वेळेनुसार 11.20 मिनिटांनी होणार असून सामन्याला 11.45 मिनिटांनी सुरूवात होईल.

IND vs ENG T20 WC 24 Live : पावसामुळे नाणेफेकीस उशीर; इंग्लंडच्या अडचणीत वाढ

पाऊस आणि ओल्या मैदानामुळं नाणेफेकीस उशीर होत आहे. पावसाचा फटका इंग्लंडला बसण्याची दाट शक्यता आहे.

T20 World Cup 2024 Live : पावसाचा लपंडाव 

गयानामध्ये पावसाचा लपंडाव सुरू आहे. काही काळ पावसाने उसंत दिल्याने मैदानावरील कव्हर हटवण्यात आले होते. मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याने वॉर्म अपसाठी आलेले खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

IND vs ENG T20 WC 24 Live : भारत - इंग्लंड सेमी फायनलपूर्वी गयानामध्ये तुफान पाऊस 

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सेमी फायनलपूर्वी जिथं सामना होणार आहे त्या गयानामध्ये तुफान पाऊस पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.