IND vs IRE T20 WC 24 : भारतीय संघ टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये आपली मोहीम 5 जूनपासून सुरू करणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा आयर्लंडविरूद्ध होणार असून या सामन्यात भारतीय संघ कोणत्या कॉम्बिनेशनने उतरणार याची सर्वांना उत्सुकता आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्याकडे भारतीय चाहते हे भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वीचा अजून एक सराव सामना असंच पाहत आहेत.
या सामन्यात भारतीय संघ कोणत्या विकेटकिपरला घेऊन मैदानात उतरणार याबाबत देखील उत्सुकता असेल. बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. तो आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात खेळणार आहे. भारतीय संघ अ गटात असून यात आयर्लंड, युएसए आणि कॅनडा हे दुबळे संघ आहेत.
सराव सामन्यात जरी रोहित आणि संजूने सलामी दिली असली तरी रोहित शर्मा आयर्लंडविरूद्ध वेगळ्याच सलामीवीरासोबत सलामीला उतरेल यात काही शंका नाही. आता रोहतच्या जोडीला विराट येणार की जयस्वाल येणार हा मोठा प्रश्न आहे.
विराट कोहली आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून जरी खूप यशस्वी ठरला असला तरी तो तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करेल. राहुल द्रविडला मोठ्या स्पर्धेत प्रयोग करायचे नाहीयेत. त्यामुळं यशस्वी जयस्वाल आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात सलामीला येण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन खूप प्रयत्नांनी भारतीय संघात दाखल झाला आहे. मात्र बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याला सलामीला संधी मिळूनही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो 6 चेंडूत 1 धाव करून बाद झाला.
मात्र ऋषभ पंतने मात्र दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सामना खेळला. त्याने 32 चेंडूत 53 धावा ठोकल्या होत्या. मात्र सराव सामन्यात ऋषभ पंतने विकेटकिपिंग केली नाही. त्याने आयपीएलमध्ये संपूर्ण हंगाम विकेटकिपिंग केली होती. जरी त्यानं सराव सामन्यात विकेटकिपिंग केली नसली तरी तो आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विकेट किपिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा ही जसप्रीत बुमराहवर असणार आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याच्या जोडीला दुसरा वेगवान गोलंदाज कोण असणार हे ठरवणं मात्र अवघड आहे. अर्शदीप सिंगने सराव सामन्यात दमदार मारा केला होता. त्यानं 3 षटकात 12 धावा दे 2 विकेट्स घेतल्या. सिराजने 3 षटकात 17 धावा देत एक विकेट घेतली आहे.
रोहित शर्मा
यशस्वी जयस्वाल
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
ऋषभ पंत
शिवम दुबे
हार्दिक पांड्या
रविंद्र जडेजा
कुलदीप यादव
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.