Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट; ICCच्या 'या' नियमाने वाढवली सर्वांची चिंता

India vs Pakistan New York Weather Update : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तो 9 जून रोजी होणार आहे.
india vs pakistan new york weather update (1)
india vs pakistan new york weather update sakal

India vs Pakistan New York Weather Update : टी-20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी जोरात सुरू आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना आयर्लंडसोबत पाच जूनला न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तो 9 जून रोजी होणार आहे. पण भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. आणि या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक नियम समोर आला असून त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.

india vs pakistan new york weather update (1)
T20 World Cup 2024 : तुफान वादळात स्टेडियमची तुटली स्क्रीन; T20 वर्ल्ड कपपूर्वी 'या' संघांचे सामने रद्द

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात न्यूयॉर्कमध्ये हवामान कसे असेल?

T20 वर्ल्ड कप 2024 चा सर्वात मोठा सामना 9 जून रोजी होणार आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. पण, त्याआधी 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील हवामानाने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

वास्तविक, हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता, तर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. हवामान अपडेटनुसार, न्यूयॉर्कमध्ये सकाळी 6 वाजता सूर्यप्रकाश असेल, परंतु जसजशी सामन्याची वेळ जवळ येईल तसतसा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

india vs pakistan new york weather update (1)
Singapore Badminton Open : सात्विकराज-चिराग शेट्टीची पहिल्या फेरीत धक्कादायक हार

2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी आसीसीने सुपर-8 सामन्यांच्या स्पर्धांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नसल्याची मोठी माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठीही राखीव दिवस नाही. आता जर सुपर-8 सामन्यांदरम्यान पाऊस पडला, तर निकाल ठरवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये 5-5 षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. पण, हेही शक्य नसल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.

india vs pakistan new york weather update (1)
Team India Playing-11 : विराट-रोहित ओपनर..., शिवम दुबे फिनिशर...; हे असू शकते टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग-11

आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाऊस खलनायक ठरला आणि दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतील. त्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठणे कठीण होऊ शकते. तथापि, रोहित शर्मा आणि कंपनीला उर्वरित 3 साखळी सामन्यांमध्ये विजय निश्चित करावा लागेल, जेणेकरून हा सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतरही ते 7 गुणांसह पुढील फेरीत सहज पोहोचू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com