T20 WC, IND vs SCO : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा खेळ 85 धावांत खल्लास!

India vs Scotland
India vs Scotland Twitter
Updated on

India vs Scotland, 37th Match, Super 12 Group 2 : शमी, जाडेजा आणि बुमराहच्या गोलंदाजीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. टॉस जिंकून विराट कोहलीने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या तिघांशिवाय अश्विनने एक विकेट घेतली तर रन आउटच्या रुपात स्कॉटलंडने एक विकेट गमावली. स्कॉटलंडकडून सलामीचा फलंदाज मुन्सी 19 चेंडूत 23 धावा, मॅकलॉड 16, मायकल लीस 21 आणि मार्क वॉटच्या 14 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. टीम इंडियाकडून शमी आणि जाडेजाने प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. बुमराने दोन गड्यांना तंबूत धाडले.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. स्कॉटलंडसह नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय नोंदवत त्यांना जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढत टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण असेल. जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा दणका दिला तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. पण यासाठी स्कॉटलंड विरुद्ध टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागणार आहे. स्कॉटलंडच्या संघाने जे आव्हान दिले आहे ते टीम इंडियाला 7.1 षटकात पूर्ण करावे लागेल. यामुळे अफगाणिस्तानपेक्षा नेट रन रेट उत्तम ठेवण्यात भारतीय संघाला मदत होईल.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने पहिल्यांदा टॉस जिंकला. शार्दुल ठाकूरच्या जागी त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये वरुण चक्रवर्तीला संधी दिली. एका बाजूला अष्टपैलू जाडेजाने तीन विकेट घेतल्या पण दुसरीकडे मिस्ट्री स्पिनर आपल्यातील जादू दाखवण्यात अपयशी ठरला. वरुण चक्रवर्तीने 3 षटकात 15 धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. अश्विनने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 29 धावा खर्च करुन एक विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()