IND vs SA T20 WC : 'खेळपट्टी, वातावरण अन् दडपण...' फायनल सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माचे मोठं वक्तव्य

मोठ्या स्पर्धेत खेळत असताना दडपण असतेच हे नाकारता येणार नाही, संघातील वातावरण सरळ, साधे, हसरे, खेळकर ठेवावे. कोणी सतत मोठ्या सामन्याची चर्चा करायची नाही.
India vs South Africa
India vs South Africa
Updated on

India vs South Africa T20 World Cup 2024 Final : मोठ्या स्पर्धेत खेळत असताना दडपण असतेच हे नाकारता येणार नाही, संघातील वातावरण सरळ, साधे, हसरे, खेळकर ठेवावे. कोणी सतत मोठ्या सामन्याची चर्चा करायची नाही. कोणाची कामगिरी झाली तरी त्याला डोक्यावर घ्यायचे नाही की कोणाची कामगिरी होत नाही म्हणून त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघायचे नाही.

वैयक्तिक कामगिरीपेक्षा एकमेकांना साथ देत संघासाठी योग्य कामगिरी कशी करता येईल याचा विचार सातत्याने करत आलोय, असे मत रोहित शर्माने अंतिम सामन्याच्या तयारीबद्दल व्यक्त केले.

India vs South Africa
IND vs SA T20 WC Final : बार्बाडोसमधून मोठी अपडेट! भारत-दक्षिण आफ्रिका फायनलची तारीख बदलणार? हे कारण आलं समोर

रोहित पुढे म्हणाला, डोके शांत ठेवले तरच मैदानावर कप्तान म्हणून मला योग्य निर्णय घेता येतात. सामन्याची तयारी करताना समोरच्या संघाची ताकद अजमावून अभ्यास करून योजना आखतो. त्यानंतर खेळाडूंना त्यांची संघाची भूमिका समजावून सांगतो. खेळाडूंनाही आम्ही आपापला विचार करायला भाग पाडतो. त्यांना त्यांच्या बलस्थानांची आठवण करून देतो आणि मग आखलेली योजना मैदानात कशी पार पाडायची याचे त्यांना विचार करायचे स्वातंत्र्य देतो. मनमोकळेपणाने प्रत्येक खेळाडूला त्याचा नैसर्गिक खेळ करायचे प्रोत्साहन देतो.

India vs South Africa
IND vs SA : शिवम दुबेचा पत्ता कट, ओपनर बदलणार? फायनलमध्ये आफ्रिकेविरुद्ध 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

शनिवारच्या सर्वात महत्त्वपूर्ण लढतीबद्दल रोहितने सांगितले की, अंतिम सामन्याचे दडपण दोनही संघांवर समान असेल. ते स्वीकारून चांगला खेळ शनिवारी करता यायला पाहिजे. तयारी पूर्ण झाली आहे. आता जास्त विचार करून घोळ घालायचा नाही. फक्त मैदानावर स्वत:ला सगळ्यांनी सकारात्मक खेळ करून व्यक्त करायचे आहे. खेळपट्टी, वातावरण आणि दडपण स्वीकारून चांगला खेळ करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.