IND vs RSA T20 World Cup 2024 Final : T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलचे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया 10 वर्षांनंतर टी-20 वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळेच अंतिम सामन्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. अंतिम सामना 29 जून रोजी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला जाईल.
बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन स्टेडिमवर या T20 वर्ल्डकपमधील आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. येथील खेळपट्टी खूपच स्पोर्टी आहे. हे गोलंदाज तसेच फलंदाजासाठी उपयुक्त आहे. या मैदानावर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. कॅरिबियन देशांतील इतर मैदानांप्रमाणे येथे मोठे स्कोअर पाहायला मिळतात. मात्र, येथे धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. अंतिम सामन्यात प्रथम खेळणाऱ्या संघाने 175 पेक्षा जास्त धावा केल्या तर ती विनिंग टोटल ठरू शकते.
एकूण सामने - 32
ज्याने प्रथम फलंदाजी केली तो जिंकला - 19
ज्याने प्रथम गोलंदाजी केली तो जिंकला - 10
सामने अनिर्णित राहिले - 02
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या - 153
सर्वोच्च धावसंख्या - 224/5 वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
सर्वात कमी स्कोअर - 80/10 अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
सर्वात मोठे रनचेस - 172/6 वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, नॉर्खिया आणि मार्को जॅनसेन हे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. केशव महाराज आणि तबरेझ शम्सी फिरकीमध्ये फॉर्मात आहेत. भारतीय संघात अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहसारखे वेगवान गोलंदाजही आहेत. कुलदीप यादव फिरकी गोलंदाजी करतो आणि रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे तीन अष्टपैलू खेळाडू संघाला चांगले स्थैर्य प्राप्त करून देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.