IND vs SA T20 WC Final : बार्बाडोसमधून मोठी अपडेट! भारत-दक्षिण आफ्रिका फायनलची तारीख बदलणार? हे कारण आलं समोर

India vs South Africa T20 World Cup Final Barbados weather Update : बार्बाडोसमधील मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
India vs South Africa T20 World Cup final Rain Barbados weather
India vs South Africa T20 World Cup final Rain Barbados weathersakal

India vs South Africa T20 World Cup Final Barbados weather : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ प्रथमच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. जरी आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम तारीख 29 जून ठेवली होती, परंतु अहवालानुसार, आता हा अंतिम सामना आज नाही तर 29 जून रोजी 30 जून रोजी होऊ शकतो. ज्याचे प्रमुख कारण समोर आले आहे.

India vs South Africa T20 World Cup final Rain Barbados weather
IND vs SA : शिवम दुबेचा पत्ता कट, ओपनर बदलणार? फायनलमध्ये आफ्रिकेविरुद्ध 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच या टी-20 वर्ल्ड कप 2024वर पावसाचे सावट आहे. पावसामुळे अनेक साखळी सामनेही रद्द झाले. याशिवाय उपांत्य फेरीतही पावसाने हजेरी लावली. यानंतर आता फायनल मॅचवरही पावसाचा तांडव पाहिला मिळू शकतो. अहवालानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पावसाची 78 टक्के शक्यता आहे. मात्र, आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे.

India vs South Africa T20 World Cup final Rain Barbados weather
IND vs SA : शिवम दुबेचा पत्ता कट, ओपनर बदलणार? फायनलमध्ये आफ्रिकेविरुद्ध 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

बार्बाडोसमधील मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बार्बाडोसमध्ये पाऊस पडत आहे. पावसामुळे आज अंतिम सामना खेळला गेला नाही. तर हा सामना 30 जून रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल.

खरंतर, अंतिम सामन्यासाठी आयसीसीने वेगळे नियम केले आहेत. अंतिम सामन्यासाठी 190 मिनिटे अतिरिक्त ठेवण्यात आली आहेत. म्हणजेच सामन्यापूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली तर 190 मिनिटे थांबावे लागेल, त्यानंतरही पाऊस थांबला नाही तर षटके कापली जातील.

या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकाही या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकायची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com